Buldana News : सोयाबीन-कापूस प्रश्नी १ नोव्हेंबर पासून होणारी 'एल्गार रथयात्रा' मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून तूर्त स्थगित केली होती. आता या 'एल्गार रथयात्रेला' ५ नोव्हेंबर पासून शेगाव येथून सुरुवात होणार आहे. ५ नोव्हेंबर पासून यात्रेचा जो नियोजित मार्ग होता. त्या मार्गाने ही यात्रा पुढे जाणार आहे. तसेच (दि.०१ ते ०४ नोव्हेंबर) दरम्यानची जी गावे यात्रेतून सुटणार आहेत. ती गावे पुढील आठवड्यात यात्रेदरम्यान कव्हर करण्यात येतील, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
शेतमालाला भाव मिळावा. येलो मोझँक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने शेतीपिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी पोटी सरसकट एकरी १०,००० रुपये नुकसान भरपाई मिळावी. सोयाबीन प्रति क्वि.९००० हजार रुपये व कापसाला प्रति क्वि. १२,५०० हजार रुपये भाव, संपूर्ण कर्जमुक्ती,वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी यात्रेचा नियोजन करण्यात आले आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच राज्यव्यापी दौरा, रथयात्रा आणि २० नोव्हेंबर रोजी एल्गार महामोर्चाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी राज्याचा दौराही पूर्ण केला. पण मराठा आरक्षणाचे आंदोलनामुळे राज्यातील अनेक यात्रा स्थगित झाल्या होत्या. तसंच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देखील तुपकर यांनी पाठिंबा दिला होता. पण मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्यामुळे रविकांत तुपकर यांनी पुन्हा यात्रेचा निर्धार करुन यात्रेचे रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर यांची एल्गार यात्रा १ नोव्हेंबरपासून सुरु होणार होती. पण मराठा आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता ही यात्रा ५ नोव्हेंबरपासून होत आहे. यामुळे १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान यात्रेत असणारी गावे देखील यात घेतली जाणार आहेत, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
Share your comments