Millionaire Farmers of India Award 2023 Sponsored by Mahindra Tractor : दिल्लीत पार पडत असलेल्या 'मिलिनीयर फार्मर ऑफ अवॉर्ड 2023' प्रायोजक बाय महिंद्रा ट्रॅक्टर कार्यक्रमाला आज (दि.८) केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री परषोत्तम रुपाला उपस्थित होते. यावेळी भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी राजाराम त्रिपाठी (छत्तीसगड) आणि रत्नम्मा गुंडमंथा (कर्नाटक) यांना केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील सर्व श्रीमंत शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर या शेतकऱ्यांना कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टरकडून ब्राझील दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याठिकाणी या शेतकऱ्यांना शेतीतील संपूर्ण नवनवीन मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
कोण आहेत रत्नम्मा गुंडमंथा?
रत्नम्मा गुंडमंथा या कर्नाटकातील श्रीनिवासपुरा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी पीयूसी, टीसीएचपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे एकूण 4 एकरपर्यंत शेती आहे ज्यामध्ये ते आंबा, बाजरी आणि रेशीमची शेती करतात. शेतीत नवनवीन तंत्राचा अवलंब करतात. त्यांच्याकडे दोन एकर आंब्याची बाग असून एक एकरात बाजरीची शेती आहे. याशिवाय एक एकरात रेशीम उत्पादन होते. त्यांनी त्यांच्या शेतात ICAR-KVK, कोलारद्वारे दिलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान देखील वापरत आहे. त्याचबरोबर केव्हीके, कोलारतर्फे आयोजित कॅम्पस प्रशिक्षणात त्यांनी पाच दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.
लोणचे आणि मसाला पावडर उत्पादने -
रत्नम्मा या शेती सोबतच व्यवसाय देखील करतात. शेती, पिके आणि धान्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच आंबा, बदाम आणि टोमॅटो वापरून लोणचे आणि मसाल्याच्या पावडरची उत्पादने बनवणे आणि विक्री करणे. यासाठी त्यांनी ICAR-IIHR, बंगलोर, ICAR-IIMR हैदराबाद आणि UHS बागलकोट येथील अनेक उपयुक्त माहिती त्यांच्या कृषी पद्धतींमध्ये समाविष्ट केली आहे.
ICAR-KVK कोलार (ICAR-KVK, Kolar) च्या सल्ल्यानुसार, कमी खर्चात राईपनिंग चेंबरचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या बागेत नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्याचे तंत्र विकसित केले आहे. ते एफपीओ, बचत गट सदस्यांकडून कच्चा आंबा खरेदी करून विकत आहेत. पिकलेल्या आंब्याचे 3 किलोच्या बॉक्समध्ये पॅकिंग आणि ब्रँडिंग केल्यानंतर, त्यांनी बेंगळुरूमधील अपार्टमेंट आणि ऑनलाइन मार्केटिंगद्वारे त्यांची विक्री करून लोकप्रियता मिळवली. रत्नम्मा यांनी 2018-19 पासून धान्यांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना शासनाची मदत तर मिळालीच, शिवाय कृषी विभागाचंही पूर्ण सहाय्य मिळाल आहे.
वर्षाला 1 कोटींहून अधिक कमाई -
महिला शेतकरी रत्नम्मा दरवर्षी अंदाजे 1.18 कोटी रुपये कमावतात. कृषी उत्पादनांबरोबरच ते धान्य उत्पादन आणि धान्यावर प्रक्रिया करतात. धान्य आणि धान्य माल्टिंग, धान्य उप-मिश्रण आणि धान्य साफ करणे आणि ग्रेन डोसा मिक्स आणि ग्रेन इडली मिक्स आणि इतर सामान्य उत्पादने जसे की आंब्याचे लोणचे, टोमॅटो लोणचे, मसाला पावडर उत्पादने तयार करतात. ही सर्व उत्पादने त्या स्वतःच्या ब्रँड नावाने बाजारात विकत आहे. रत्नम्मा वैदिक खाद्यपदार्थांसह देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे.
"देशातील शेतकरी हे देशाच्या हृदयाचे ठोके आहेत, ज्यांच्याशिवाय राष्ट्रीय अर्थव्यवस्था चालू शकत नाही. सकल देशांतर्गत उत्पादनात शेतीचे महत्त्वाचे योगदान महत्त्वाचे आहे. देशात शेतकऱ्यांना पेक्षा आजकाल व्यापारी श्रीमंत होताना दिसत आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे. तसंच आगामी काळात शेतकऱ्यांनी शेतीतील बदल ओळखून त्यात बदल केला पाहिजे. शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजे."
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
"'मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये देशभरातून शेतकरी आले आहेत. यात महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा अधिक समावेश दिसून आला. तसंच आपला शेतकरी पिकवत आहे पण त्यांना अजून विकता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक सक्षम होता येत नाही. जेव्हा शेतकरी आर्थिक सक्षम होईल तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी श्रीमंत होईल. आशा आहे की आगामी काळात सर्व शेतकरी श्रीमंत झालेले असतील."
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
Share your comments