1. बातम्या

लई भारी! रत्नागिरीच्या 'या' सुपुत्राने सलग सातव्या वर्षी पहिली हापूस पेटी परराज्यात पाठवण्याचा मान पटकावला

कोकणची शान हापूस आंब्याची आवक आता हळूहळू बाजारपेठेत बघायला मिळत आहे. नुकतेच कोल्हापूर एपीएमसीमध्ये (Kolhapur APMC) दाखल झालेल्या हापूस आंब्याला विक्रमी दर प्राप्त झाला. कोल्हापूर एपीएमसीमध्ये मुहूर्ताच्या एका हापूस आंब्याच्या पेटीला चाळीस हजार आठशे रुपये असा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. त्यामुळे हापूस आंबा (Hapus mango) हंगामाच्या सुरुवातीलाच चर्चेचा विषय बनला आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील एका हापूस आंबा उत्पादक शेतकर्‍यांचा एक आगळा वेगळा विक्रम जाणून घेणार आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
hapus mango

hapus mango

कोकणची शान हापूस आंब्याची आवक आता हळूहळू बाजारपेठेत बघायला मिळत आहे. नुकतेच कोल्हापूर एपीएमसीमध्ये (Kolhapur APMC) दाखल झालेल्या हापूस आंब्याला विक्रमी दर प्राप्त झाला. कोल्हापूर एपीएमसीमध्ये मुहूर्ताच्या एका हापूस आंब्याच्या पेटीला चाळीस हजार आठशे रुपये असा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. त्यामुळे हापूस आंबा (Hapus mango) हंगामाच्या सुरुवातीलाच चर्चेचा विषय बनला आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील एका हापूस आंबा उत्पादक शेतकर्‍यांचा एक आगळा वेगळा विक्रम जाणून घेणार आहोत.

जिल्ह्याच्या रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यात मौजे गणेशगुळे येथील रहिवाशी शेतकरी व प्रगतिशील आंबा बागायतदार (Mango gardener) शिंदे शशिकांत यांनी सलग सातव्यांदा फेब्रुवारी महिन्यात परराज्यात हापूस आंबा पाठवण्याचा नाविन्यपूर्ण विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. या वर्षी त्यांनी सात हापूस आंब्याच्या पेट्या अहमदाबाद बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवल्या आहेत. शिंदे (Shashikant Shinde) यांनी शेतीक्षेत्रात अहोरात्र काबाडकष्ट करून आंब्याची बाग यशस्वी करून दाखवली आहे. आपल्या कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर तसेच कष्टाला वातावरणाची साथ मिळाल्यामुळे शिंदे यांनी मागील सहा वर्षांपासून जानेवारी ते फेब्रुवारी या काळात परराज्यात पहिली हापूस पेटी पाठविण्याचा मान पटकावला आहे. शिंदे यांनी यावर्षी देखील अहमदाबाद बाजारपेठेत हापूस आंब्याच्या पेट्या पाठवल्या म्हणजे शिंदे यांनी सातव्यांदा हापूस आंबा परराज्यात विक्री साठी पाठवला आहे.

शशिकांत शिंदे गेल्या अनेक वर्षापासून शेती करत आहेत, शेतीमध्ये त्यांनी हापूस आंब्याच्या कलमांची लागवड केली आहे. असे सांगितले जाते की, प्रारंभी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हापूस आंबा परराज्यात पाठवण्याची रीत होती. याच रीतिरिवाजाचे काटकसरीने पालन करून शिंदे यांनी सलग सातव्यांदा हापूस आंब्याची पेटी परराज्यात पाठवण्याचा मान पटकावला आहे. आंबा शेतीत यशस्वी होण्यासाठी शिंदे यांनी अहोरात्र काबाडकष्ट केले आहेत. कठोर कष्टामुळे, जिद्दीमुळे तसेच वातावरणाने साथ दिल्यामुळे सातव्यांदा मुहूर्ताला हापूस परराज्यात पाठवल्याचे शिंदे यांनी सांगितले. या हंगामातही शिंदे यांनी कष्टाची पराकाष्टा करीत मुहूर्ताला हापूसची पेटी परराज्यात पाठवून दाखवली आहे. 

प्रतिकूल वातावरणाचा सामना करत शिंदे यांनी हापूस आंब्याची पेटी परराज्यात पाठवली आहे. यावर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे तसेच वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे हापूसचा हंगाम उशिरा सुरु झाला, मात्र असे असले तरी शशिकांत शिंदे या अवलिया आंबा बागायतदारांने सलग सातव्यांदा परराज्यात पहिली हापूसची पेटी पाठवण्याचा मान आपल्या नावावर अर्जित केला असल्याने त्यांना याविषयी प्रसन्नता आहे. तसेच सातव्यांदा परराज्यात पहिली हापूसची पेटी पाठवण्याचा मान पटकावल्याने पंचक्रोशीत देखील शिंदे यांच्या कार्याची वाहवाह होत आहे.

English Summary: ratnagiris farmer send first hapus mango box to interstate 7th time Published on: 10 February 2022, 08:01 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters