बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की रेशन दुकानदार रेशनचे धान्य देण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा कमी प्रमाणात देतात. त्यासाठी जनतेला त्याविरोधात तक्रार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु शासनाने आता यामध्ये अरे सकारात्मक बदल करून असल्या गोष्टींसाठी तक्रार करता येईल यासाठी मेरा रेशन ॲप आणले आहे.
या ॲपद्वारे तुम्हाला अन्नधान्य दुकानात किती धान्य आले व त्यातून किती वाटप केले गेले याविषयी सविस्तर माहिती अगदी एका क्लिकवर मिळणार आहे. या ॲपद्वारे तुम्ही स्वस्त धान्य दुकानात कोणत्या प्रकारचे धान्य आले आहे? किती धान्याचा पुरवठा हा झालेला आहे? धान्याचे वेळेत वाटप होते आहे की नाही या बद्दल ची सगळी माहिती एका क्लिकवर तुम्हाला मिळेल.
जर दुकानदार लाभार्थींना अन्यायकारक आणि व्यवस्थित वागणूक देत नसेल तर त्याविरोधात तुम्हाला तक्रार देखील दाखल करता येऊ शकते. या ॲपचा वापर रेशन कार्डधारकांना करता यावा त्यासाठी रेशन कार्ड धारकांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. त्याद्वारे तुम्हाला वर दर्शविल्याप्रमाणे सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते.
अगोदर रेशन कार्ड दुकानदार कमी जास्त प्रमाणात अन्नधान्याचे आणि रॉकेलचे वाटप करत असत परंतु आता त्यांना सगळ्यांना समान पद्धतीने वाटप करावे लागणार आहे. मनमानी कारभार करणाऱ्या दुकानदारा विरोधात या ॲपद्वारे तक्रार करणे सोपे झाले आहे.
Share your comments