1. बातम्या

आता मिळतील रेशन कार्ड संबंधित सर्व सेवा ऑनलाइन, जाणून घेऊ त्या बद्दल

रेशन कार्ड हे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचे कागदपत्र आहे.रेशन कार्ड नवीन मिळवणं किंवा त्यामध्ये असलेल्या काही नोंदीमध्ये बदल करणं हे एक फार अवघड काम आहे.त्यासाठीअनेक प्रकारचे अर्ज फाटे किंवा अधिकाऱ्यांच्या भेटी असले उपद्व्याप करावे लागतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
ration card

ration card

रेशन कार्ड हे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचे कागदपत्र आहे.रेशन कार्ड नवीन मिळवणं किंवा त्यामध्ये असलेल्या काही नोंदीमध्ये बदल करणं हे एक फार अवघड काम आहे.त्यासाठीअनेक प्रकारचे अर्ज फाटे किंवा अधिकाऱ्यांच्या भेटीअसले उपद्व्याप करावे लागतात.

विशेष म्हणजेरेशन धान्य दुकानांतुनअन्नधान्य खरेदीसाठी हे लागतेच. अल्प आणि गरीब उत्पन्न गटातील कुटुंबासाठी रेशनकार्ड हे अत्यावश्यक आहे. बरेचदा रेशन कार्ड हरवल्यास डुबलीकेट रेशन कार्ड बनवण्यासाठी किंवा रेशन कार्ड आधार लिंक कसेकरावेयाबाबतचीमाहिती बऱ्याच जणांना नसते.

 परंतु डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे ती म्हणजे रेशन कार्ड संबंधित कुठल्याही प्रकारची जर समस्या असेल तर त्या संबंधित सेवांचा लाभ संबंधित व्यक्ती नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून घेऊ शकतात.

या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक रेशन कार्ड वरील कुठल्याही प्रकारची माहिती आता अपडेट करू शकतात. तसेच रेशन कार्ड आधार कार्ड शी लिंक करण्याचे कामही केले जात. तसेच रेशन कार्ड गहाळ झाले असेल तर त्याचे डुप्लिकेट प्रिंटही मिळते. रेशन कार्ड संबंधित कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील तर त्या या केंद्राच्या माध्यमातून सबमिट करता येतात.रेशन कार्ड गहाळ झाले असल्यास नवीन रेशन कार्ड साठी करायचा अर्ज देखील या केंद्रावर करता येतो अशी माहिती डिजिटल इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर दिली आहे.

 

 कॉमन सर्विस सेंटर सुविधेने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता या केंद्राच्या माध्यमातून रेशनकार्ड संदर्भातील सगळ्या सेवा पुरवल्या जाणार आहेत. रेशन कार्ड संबंधित इं सगळ्या सेवा आता कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सुटू शकणार असल्याने  रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ( स्त्रोत-News 18 लोकमत) )

English Summary: ration card related complain or new ration card received by online Published on: 18 September 2021, 08:59 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters