रेशनकार्ड (ration card) काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अनेकजण रेशनकार्डपासून वंचित राहिले असताना पाहायला मिळत आहे. मात्र आता अशा सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
वन नेशन वन रेशनकार्ड (One Nation One Ration Card) योजनेंतर्गत रेशनकार्ड प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. त्यामुळे आता घरबसल्या रेशनकार्ड काढता येणार आहे. रेशनकार्डचा लाभ घेता यावा यासाठी भारत सरकारने (Government of India) वन नेशन वन रेशन कार्ड योजना हा प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे.
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची (One Nation One Ration Card scheme) अधिकृत वेबसाइट www.impds.nic.in आहे. रेशन कार्ड योजना सुरू झाल्यापासून, 24 राज्यांतील 69 कोटी लोकांना या योजनेचा लाभ झाल्याचा अंदाज आहे.
Animal Husbandry: जनावरांमध्ये कॅल्शिअमची कमतरता आहे? तर वेळीच लक्षणे ओळखून करा उपचार
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वन नेशन वन रेशन कार्ड योजना सार्वजनिक वितरण प्रणालीमधून अनुदानित धान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना राज्य सरकार शिधापत्रिका (ration card) प्रदान करते.
रेशनकार्ड होणार उपलब्ध
असुरक्षित घटकांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी आणि त्यांना अन्न सुरक्षा (Food security) प्रदान करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
खरीप हंगामातील पिकांवर किडींचा प्रादुर्भाव; वेळीच करा कीड व्यवस्थापन, अन्यथा होईल मोठे नुकसान
मे महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेसह अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. अर्थव्यवस्थेतील (Economy) तरलतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी ही घोषणा 20 लाख कोटींच्या पॅकेजचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठी तंत्रज्ञान प्रणाली वापरली जाईल, ज्यामुळे स्थलांतरितांना मार्च 2022 पर्यंत भारतातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून रेशन कार्ड मिळू शकेल, अशी माहिती देण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या
Electric Scooters: Hero एलेक्ट्रिक स्कूटर फक्त 10 हजार रुपयात घरी घेऊन या; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये
विनायक मेटेंच्या अपघाताबाबत खळबळजनक माहिती आली समोर! अपघाताआधी 3 ऑगस्टला...
Share your comments