जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. संपुर्ण खानदेश पट्ट्यातच केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या केळी ला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे सुरूच आहे.
जर केळी पिकाचा विचार केला तर केळी पिकाची कांदेबाग लागवड ही जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, जामनेर तसेच चोपडा तालुक्यात जास्त प्रमाणात होते.या कांदे भागाची काढणीआता पूर्ण होत आली असून केळीची आवक कमी झाली आहे.परंतु तरीदेखील केळीला म्हणावा तेवढा दर मिळत नाहीये.
खानदेश मध्ये दररोज 170 ट्रक केळीची काढणी सुरू आहे.आवक फारच कमी आहे परंतुकेळीला उत्तरेकडील बाजारपेठेत उठाव नसल्यानेकेळीचे दर कमी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तरेकडील भागात खानदेश मधून दररोज 100 ते 130 ट्रक केळी पाठवली जात आहे.तसेच राज्यातील ठाणे, मुंबई तसेच नागपूर व इतर राज्य जसे की राजस्थान, छत्तीसगड येथे केळी पाठवली जात आहे.पंजाब, काश्मीर आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये असलेली थंडी आणि पावसामुळे केळी पाठवण्यात अडचणी येत आहेत.
तेथेही केळीची मागणी खूपच कमी असल्याने केळी भावावर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात उत्तरेकडे केळीला उठाव वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आता कांदेबाग काढणीनंतर फेब्रुवारीच्या अखेरीस येणाऱ्या नवती केळीच्या काढणीला वेग येईल, त्यावेळेस भावामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
Share your comments