बीजमातेच्या शिरपेचात मानाचा तुरा, राष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'हा' सन्मान जाहीर
अहमदनगर- आशिया खंडातील अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय लक्ष्मीबाई पाटील जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार देशी बियांचे जतन व संवर्धन करणाऱ्या ‘पद्मश्री’ बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरस्काराची घोषणा केली. दोन लाख पन्नास हजार रुपये रोख,मानपत्र, रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
अहमदनगर- आशिया खंडातील अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय लक्ष्मीबाई पाटील जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार देशी बियांचे जतन व संवर्धन करणाऱ्या‘पद्मश्री’ बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरस्काराची घोषणा केली.दोन लाख पन्नास हजार रुपये रोख,मानपत्र, रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
येत्या 9 मे रोजी सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या समारंभात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.‘पद्मश्री’ सन्मानानंतर राहीबाई पोपेरे यांना जाहीर झालेला दुसरा सन्मान आहे. राहीबाई यांच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सीड मदर ते पद्मश्री
राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. 2020 साली पद्मश्री पुरस्कार दिला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.
राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्त्रीया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.
निसर्ग हाच शिक्षक
आदिवासी समाजाच्या राहीबाई निरक्षर आहेत, पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या. लहानपणापासून त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. राहीबाईंच्या वडिलांकडून त्यांना हे ज्ञान मिळाले त्यांचे वडील नेहमी म्हणायचे “जून ते सोन” त्याचा अर्थ राहीबाईंनी चांगला समजून घेतला.
English Summary: rashtriya lakshmibai patil jivangaurav award declered to rahibai poprePublished on: 25 September 2021, 09:32 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments