उस्मानाबाद- विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे अजूनही शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या नुकसानीच्या तुलनेत शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयांचा विमा मिळावा या मागणीसाठीउस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्तारोको करण्यात आला होता.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. परंतु अजूनही विमा कंपन्या वेळकाढूपणा करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील सोलापूर औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी रास्ता रोको करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कृषी विभाग व संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले मात्र या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तुमच्या बाबतीतली सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्स कंपनीने अधिक प्रमाणात विमा काढलेला आहे.त्यामुळे वेळेत शेतकऱ्यांचे पैसेअदा न केल्याने या विमा कंपनी वर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.
किंमत कंपन्यांनी वेळेस क्षेत्राचे पैसे दिले नाहीत तर त्यांच्या गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिले होते. आता यासंबंधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे बजाज अलायन्स कंपनी वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पुढील काळात या कंपनीवर काय कारवाई होणार हे पाहावे लागणार आहे. ((संदर्भ-tv9 मराठी )
Share your comments