Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानगव्याचा मुक्तसंचार वारंवार दिसून येत असल्याने शेतकरी आणि नागरिक भयभयीत झाले आहेत. जिल्ह्यातील शिरगाव, कुवळे,चाफेड नंतर आता फणसगाव, दारुममध्ये आणि देवगड तालुक्यात रानगवे दिसून आले आहे. यासोबत रानगव्यांनी आंबा बागांचं देखील नुकसान केलं आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झालं आहे.
गावातील शेतात घुसून रानगवे शेत पिकांचे नुकसान करत आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरु असल्याने झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली आहेत. त्यात रानगव्यांकडून शेतात घुसून बागांचं नुकसान केलं जात आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे वनविभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
गावात सध्या रानगव्यांचा मुक्त संचार होऊ लागल्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. फणसगाव येथे दोन गवे गावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर जात असतानाचे एका व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आलं आहे. वन परिसरातील रानगवा मानवी वस्तीत येऊन ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत करताना दिसून येत आहे.
वळू चित्रपटाच्या माध्यमातून गावातील वळूमुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास आणि तो वळू पकडण्यापर्यंतची सर्व कसरत जशी चित्रपटात दाखवली होती. तशीच परिस्थिती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
Share your comments