गेल्या काही दिवसांपासून रोडवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकांचे निधन देखील झाले आहे. असे असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या कारला अपघात झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर राणे कुटुंबीयांच्या कारचा अपघात झाला. यावेळी गाडीत नितेश राणे त्यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. नितेश राणे यांची पत्नी नातेवाईकांसह पुण्याच्या दिशेने येत होत्या. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेले अपघात चर्चेचे विषय ठरत आहेत.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोल नाका येथे टोल भरण्यासाठी मोटर रांगेत होती, तेव्हा पाठीमागे असलेल्या ट्रकने राणे कुटुंबीयांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली. टोलनाका असल्याचे वाहनाचा वेग कमी होता. यामुळे जास्त हानी झाली नाही.
बातमी कामाची! आता विमा पॉलिसीवर कर्ज मिळेल, व्याजदरही कमी, वाचा महत्वाची माहिती
दरम्यान, या प्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या शिरगावं पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या अपघातामध्ये वाहनांचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र राणे कुटुंबियांसह सर्वजण सुखरुप आहेत. कुटुंबिय पुण्याला जात होते. मार्गावर एका ट्रकची धडक बसली. मात्र, कोणालाही दुखापत झालेली नाही. कुटुंबिय पुण्यातील घरी पोचले आहेत, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी जगायचे कसे? उडीद, तुरीचे मोठे नुकसान, रोहित पवारांची मदतीची मागणी
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ, म्हणाले यापुढे कधीच कारमध्ये..
कृषी जागरणचे २६ व्या वर्षात पदार्पण, देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासणारा पहिला मीडिया हाऊस..
Share your comments