1. बातम्या

Ram Mandir : रामलल्लांची आज प्राणप्रतिष्ठापना; देशभरात भक्तिमय वातावरण

Ram mandir live update : प्राणप्रतिष्ठापनेसाठी रामाची नवीन मूर्ती तयार करण्यात आली आहे. प्रभू रामाच्या ५१ इंचाच्या नव्या मूर्तीचे आज अभिषेक करुन त्याची प्रतिष्ठापन केली जाणार आहे. यामुळे संपुर्ण मंदिर परिसरात सजावट करण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांनी मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

Ram Mandir Update News

Ram Mandir Update News

Ayodhya Ram Mandir Live Update : आज संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. अयोध्येत आज (दि.२२) रामलल्ला यांची प्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. १२:३० ही प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रतिष्ठापनासाठी फक्त ८४ सेंकदाचा महत्त्वाचा मुहूर्त आहे. त्या वेळेतच ही प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

प्राणप्रतिष्ठापनेसाठी रामाची नवीन मूर्ती तयार करण्यात आली आहे. प्रभू रामाच्या ५१ इंचाच्या नव्या मूर्तीचे आज अभिषेक करुन त्याची प्रतिष्ठापन केली जाणार आहे. यामुळे संपुर्ण मंदिर परिसरात सजावट करण्यात आली आहे. विविध रंगांच्या फुलांनी मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

काशीचे विद्वान आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित मुख्य पुजारी म्हणून आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह पाच जण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनादरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यात असणार आहेत. या पाच जणांमध्ये पंतप्रधान, पुजारी आणि सरसंघचालक यांचा सहभाग असणार आहे. हे पाचजण गाभाऱ्यात असणार आहेत.

राम मंदिरासाठी फक्त देशभरातील विविध क्षेत्रातील ८ हजार लोकांचा निमंत्रण देण्यात आले आहे. यात अभिनेते, राजकीय व्यक्ती, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग आहे. तसंच मंदिर परिसरात देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सोहळ्याचे देशभरात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे.

दरम्यान, आज प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर आज सायंकाळच्या वेळी दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. तसंच राम मंदिर परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच देशभरातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

English Summary: Ram Mandir Ram Lalla inauguration today ram mandir live update ayodha Published on: 22 January 2024, 12:04 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters