1. बातम्या

राजू शेट्टीचा हुंकार!! भोंगे उतरवण्याचे राहुद्या आधी शेतकऱ्याची झाडाला लटकलेली बॉडी उतरवा

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कृषिप्रधान देशात कृषिप्रधान देशाचा (Agriculture Country) कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला (Farmer) मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) देखील दिवसेंदिवस लक्षणीय वाढल्या आहेत. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
raju shetty

raju shetty

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कृषिप्रधान देशात कृषिप्रधान देशाचा (Agriculture Country) कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला (Farmer) मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) देखील दिवसेंदिवस लक्षणीय वाढल्या आहेत. महाराष्ट्रात तर शेतकरी आत्महत्याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक आहे.

यामुळे सध्या सुरू असलेल्या अजाण, हनुमान चालीसा आणि भोंगा या राजकारणाला थोडं बाजूला सारून शेत शिवारात शेतकऱ्यांची जी प्रेते झाडाला लटकलेली आहेत ती आधी खाली उतरवा असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghatana President and former MP Raju Shetty) यांनी केला आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून अजाण हनुमान चालीसा आणि भोंगा या तीन गोष्टींवरून विशेष वाद बघायला मिळत आहेत. यामुळे राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सरकारवर निशाणा साधत सांगितले की, झाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत. ती आधी खाली उतरवा आणि मग भोंगे उतरवायचे की नाही याचा निर्णय घ्या.

निश्चितच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत एक मोठा शंखनाद केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका मेळाव्यासाठी राजू शेट्टी उपस्थित होते यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी एका बाणात दोन शिकार केले असल्याचे सांगितलं जातं आहे.

या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर हात घालत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंगे उतरवण्याच्या धोरणावर टीकास्त्र सोडले आहे तर शेतकरी आत्महत्याचा गहन प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडी सरकारवर देखील एक मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निश्चितच एक तीर से दो निशान असं आशयाचं हे विधान सध्या राजकीय वर्तुळात गदारोळ उडवणारे आहे. शेट्टी म्हणाले की शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळायला हवा होता मात्र झालं यापेक्षा उलट.

खतांच्या किमती वाढल्या, डिझेलचा दर वाढला, स्वयंपाकाचा गॅस महागला मात्र शेतमालाला हमीभाव काही मिळाला नाही. भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहेत त्यावर काही समाधान काढले गेले नाही. एकंदरीत राज्यात मूलभूत प्रश्नांवर प्रकाश झोत टाकण्याऐवजी आणि त्यांचे निराकरण करण्याऐवजी या सध्या महाराष्ट्रात भलत्याच मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचे राजू शेट्टी यांनी नमूद केले.

सरकारच्या या उदासीन वागणुकीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मोठी अस्वस्थता असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. सरकारच्या धोरणावर सामान्य नागरिकांसमवेतच शेतकऱ्यांचा सरकारवर आक्रोश आणि असंतोष आहे. मात्र हा असंतोष हुंकार बनून बाहेर पडणं आता गरजेचं आहे. आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर भोंगे उतरवा असं म्हणत राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.

English Summary: Raju Shetty's roar !! Before removing the horn, remove the body of the farmer hanging from the tree Published on: 02 May 2022, 12:13 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters