सध्या राज्यात शेतकरी अनेक कारणाने संकटात सापडला आहे. यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. शेतकरी नेते यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने आणि उपोषणाला बसले आहेत. गेल्या 10 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष (Raju Shetty) राजू शेट्टी हे कृषीपंपांना 10 तास आणि तो ही दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत. असे असले तरी याकडे सरकारचे लक्ष नाही. यामुळे निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच आता जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनीही मोहळमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरणने कृषीपंपाबाबत घेतलेली भूमिका ही चूकीची असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बांधावरची स्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहे. मात्र यावर ठोस असा निर्णय होत नाही. यामुळे मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षतेचा विचार करीता दिवसा आणि तो ही 10 तास विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात बेमुदत उपोषण सुर केले आहे.
उर्जामंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता आंदोलनाची पुढची दिशा काय असणार यासंदर्भात मंगळवारी दुपारी कार्यकर्त्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी अनेक सरकारी कार्यालयात साप देखील सोडले होते. यामुळे निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रब्बी हंगामातील पिके ऐन बहरात आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणी मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे पण कृषी पंपाचा विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.
तसेच सध्या उन्हामध्ये वाढ झाल्याने पिके जळू लागली आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. यंदा तर पाणीसाठा मुबलक असून त्याचा पुरवठा करणे मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा, खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिलाची वसुली थांबवावी तसेच पैसे भरुनही त्याची पावती न देणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी जनहितचे प्रभाकर देशमुख उपोषण करत आहेत.
जोपर्यंत वीज बिलाची वसुली थांबत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा जनहितने दिला आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे अजून शेतकऱ्यांचे किती नुकसान होणार आणि सरकार किती दिवस गप्प बसणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Share your comments