आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांन विरोधात राजू शेट्टी यांनी आत्मक्लेष पदयात्रा सुरू केली आहे. त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यामधील दत्त कारखान्यापासून झाली आहे. हे आत्मक्लेश आंदोलन एकूण 22 दिवस करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषदही पार पडणार आहे.
Kolhapur News : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांन विरोधात राजू शेट्टी यांनी आत्मक्लेष पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेला आज (दि.१७) पासून सांगलीतीलशिरोळ तालुक्यामधील दत्त कारखान्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. आत्मक्लेश आंदोलन एकूण २२ करण्यात येणार असून या दरम्यान राजू शेट्टी ५२२ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यावेळी ते शतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न जाणूुन घेणार आहेत. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषदही देखील पार पडणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २२ दिवस ५२२ किलोमीटर पदयात्रा असणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या हंगामातील ४०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरु केला दिला जाणार नाही, असा इशारा यावेळी शेट्टी यांनी दिला आहे.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सांगली येथे भेट घेतली आहे. यावेळी कडू यांनी या पदयात्रेला पाठिंबा दिला आहे.
English Summary: Raju Shettys Aatmaklesh Padayatra starts from todayPublished on: 17 October 2023, 11:27 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments