Raju Shetti : या वर्षी कारखान्यांनी यंदाची एफआरपी एकरकमी द्यावी, हंगाम संपल्यानंतर ३५० रुपये द्यावेत, आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपी (FRP) पेक्षा दोनशे रुपये जास्त मिळावेत अशा विविध मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केल्या आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद संपन्न झाली.
यावेळी शेट्टी बोलत होते. दरम्यान, सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी राज्यातील ऊस वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
7th pay commission: कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनात होणार मोठी वाढ
7 नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार
ऊस दराच्या मागणीसह साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुट करत आहेत, असा आरोप राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर केला आहे. राज्यातील साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन केले जावेत. त्याचबरोबर सर्व साखर कारखान्याच्या काट्यांवर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे आणि यासंदर्भात अंमलबजावणी करावी.
महागाईतून दिलासा; LPG सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त, हे आहेत नवे दर
या मागणीसाठी येत्या सात नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शेट्टींनी यावेळी दिला आहे. सरकारनं गांभिर्याने लक्ष दिले नाही तर 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिलाय.
मुकादमांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्यानं मुकादम व्यवस्था संपवावी. बांधकाम मजुरांप्रमाणं महामंडळानं ऊस तोडणी मजूर पुरवावेत. मुकादम कारखाना आणि शेतकऱ्यांची देखील फसवणूक करतात असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
'कृषिमंत्री आमच्या शेतकरी बांधवांचे प्रेत पाण्यावर तरंगण्याची वाट पाहत आहेत का'?
Share your comments