देशाच्या अमृतमहोत्सवात या धनगरवाड्याने लालपरी पाहिली. येथील लोक आजपर्यंत रानावणातून जात होते. शाहूवाडी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील धनगरवाड्या वस्त्यांवर राजू शेट्टी यांनी रोड बनवून घेतला. यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
फक्त रस्ता करून झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं न मानता जोपर्यंत या वाडीवस्तीवरील मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात येणार नाहीत, ती शिक्षित होऊन या स्पर्ध्येच्या युगात टीक धरू शकणार नाहीत. अस राजू शेट्टी यांना माहिती होत यामुळे त्यांचे प्रयत्न सुरूच होते.
शाहूवाडी तालुक्यातील उखळू गावच्या आंबईवाडी धनगरवाडीला देशाच्या अमृतमहोत्सवात नंतरही साधी पायवाटही नव्हती. सगळा वाडा जंगलातून वाट काढतच येत असे. कोणाला दवाखान्यात न्यायची वेळ आली तर जिवंतपणीच तिरडी करून आणावं लागायची असं या वाड्यावरील लोक सांगतात.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार तरी कधी? 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांची आत्महत्या..
गेल्यावर्षी पर्यंत रोजचे दोन कॅन दूध ते ही १० किमी अंतर जंगलातून चालत येऊनच डेअरीला द्यावं लागे. आज या वाड्यावर १६ कॅन दूध डेअरीची गाडी येऊन घेऊन जाते. म्हणजे या वाड्यावरील लोकांचे उत्पनाचे साधन वाढले.
पण मुलांना अजूनही १२ किमी अंतर पायी चालत जाऊनच शाळेला जावे लागते. ही एकच गोष्ट माझ्या मनाला खलत होती. आणि मन अस्वस्थ व्हायचे. आपण या वाडीला रस्ता देण्यासाठी मी मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रयत्न करून रस्ता झालाही पण या विद्यार्थ्यांचे कष्ट कमी करू शकलो नाही.
शेतकऱ्यांनो गाय, म्हैस आणि शेळी खरेदी विक्रीसाठी अॅप, सर्व कामे होतील एका क्लिकवर
या स्पर्ध्येच्या युगात ही मुलं अशीच माग राहतील असे वाटू लागले. याकरिता संबंधित यंत्रणांना जागेवरच बोलावून आपल्याला या वाडीत एस.टी. आणायचीच आहे. ती बारमाही कधी चालू कधी बंद असं चालणार नाही. त्यासाठी जे रस्त्याचे आजून काम करून घ्यायचे आहे ते करून बससेवा सुरू करण्यास सांगितले. संबंधित सर्व सरकारी यंत्रणाचीही सहकार्याची भावना होती.
येणाऱ्या चार दिवसातच या वाड्यावर एस.टी. रोज धावताना आणि विद्यार्थी अगदी आनंदाने शाळेला जाताना दिसतील यात शंका नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या रोडमुळे शिक्षण, आर्थिक उदरनिर्वाह यासह अनेक प्रश्न मिटणार आहेत.
महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा, कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय
आता बिअर कडू लागणार नाही, येणार स्वादिष्ट बिअर...
राजू शेट्टींनी इशारा देताच छत्रपती कारखान्याचे गाळप बंद, FRP पेक्षा 200 जास्तच घेणार...
Share your comments