नमस्कार आदरनिय शेतकरी बांधव आपन भारतीय कृषी प्रधान देशाचे नायक कींवा राजा म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण आज दुर्दैवाने शेतकरी हा कायमचा दुर्लक्षित झाला भारता सारख्या कृषी प्रधान देशाचे दुर्दैव असे की संपूर्ण जगाचा पोशिंदा अवहेलना,गरिबी,कुचेष्टेचा कायमचा बळी पडला आहे.
त्याची समाजात ओळख म्हणजे शेतकरी हा समाजाचे ओझं संपूर्ण मानवी समाजाच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी कायमचा वखराला जुंपलेला बैलं असे समजतं असतात.कोणती वेळ आत्मसन्मानाची आली की मग त्याच शेतकऱ्यांना बळीराजा, अन्नदाता, शेतकरी राजा असे संबोधले जाते व तो कोठे कोठे कौतुकास पात्र ठरतो.त्याच्या या कार्याची कोठेतरी दखल घेतली पाहिजे,हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त्य २१ मे शेतकरी,शेतमजूर,शेतीशी निगडित प्रशासकीय अधिकारी,कृषी तंज्ञ यांचा गौरव करण्याची संकल्पना तत्कालीन खासदार अध्यक्ष स्व राजीव साहेब सातव यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आणि आपापल्या जिल्ह्यात स्व राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यास प्रेरित केले.येथूनच राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार सुरू झाला.आपल्या विभाग त्या वेळेस या पुरस्काराची पुर्ण जवाबदारी श्री प्रकाश जी साबळे यांच्या खांद्यावर दीली. स्व राजीव सातव यांना माहीत होते की कोणती जवाबदारी कोणाला द्यावी कारण प्रकाश जी साबळे हे शेतकर्याच्या हीता साठी झटणारे व्यक्तीमत्व होते तसेच अनेक राष्ट्रीय व सामाजिक कामा करीता त्याची ओळख आहे.आपल्या कामाची सुरुवात ही गावातुनच केली.
ती म्हणजे स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी नया अकोला ता.जी.अमरावती येथे शेतकऱ्यांचा सन्मान करून "राजीव गांधी कृषिरत्न पुरस्काराची" यशस्वी मुहूर्त प्रकाश जी साबळे यांनी केली.त्या नंतर दरवर्षी प्रमाणे वेगवेगळ्या ठीकानी जसे राष्ट्रसंताच्या जन्मभुमीतुन म्हणजे यावली शहीद मधुन २००८मधे राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार सोहळा पार पडला या मधे काही गोष्टी लक्षवेधी होत्या त्या म्हणजे शेतकर्यांचा खांद्याला खांदा लावून मदत करणारी व संसाराची धुरा सांभाळनारी स्त्री शक्तीचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात आला.या शेतमाऊलीच्या उपकाराची परतफेड करण्याच्या उद्देशाने प्रकाश जी साबळे यांच्या मनात सहजपणे कल्पना निर्माण झाली व स्त्री जातीला सन्मानित करण्याचे सुरवात हा कार्यक्रमात झाली.२००९ साली खोलापूर गावात हा सोहळा स्व राजीव जी सातव यांच्या उपस्थितीत पार पडला.मा.राजीव सातव यांच्या हस्ते काळ्या मातीत राब राबणाऱ्या शेतकरी पुत्रांचा गौरव करण्यात आला.मग ही संकल्पना अशिच चालु राहील या उद्देशाने २०१०साली "राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्टान"स्थापन करून कृषिरत्न पुरस्काराचे स्वरूप व्यापक करून अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १४ प्रयोगशील,यशस्वी शेतकऱ्यांना गौरवाणीत केलं.२०११-१२ या वर्षीचा पुरस्कार सोहळा अमरावती येथे पार पडला.यामध्ये शेतकरी वर्गाशी संबंधित कृषी अधिकारी,मंडळ अधिकारी, कृषी तज्ञ,कृषी वैज्ञानिक या व्यक्तीचा सन्मान करण्याची कल्पना समोर आली लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात प्रकाश जी साबळे यांना यश आले व मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण सोहळा आयोजित केला.
शेतकरी वर्गाला आत्मनिर्भर करण्यासाठी,शेती व्यवसायला पूरकजोड धंदा करण्यासाठी शेतकरी बचत गटाची निवड केली,यातून त्यांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केले. केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने कृषी विभागाचे मानाचे पुरस्कार मिळाले. काही पुरस्कार शेतकऱ्यांना त्यांच्या शेताचा बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आले. कमी खर्चाची शेती करून शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या देशाच्या उत्पादनात वाढ करतोय.देशातील जनतेची अन्नधान्याची गरज पूर्ण करतोय आणि देशाच्या प्रगतीसाठी कायम झटनारा आहे तसेच विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेतकरी आणि शेती व्यवसाय समृद्ध होईल.शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक जण समोर येतात.हीच या पुरस्कारच वैशिष्ट्य .या वेळी हा पुरस्काराचा सोहळा २१ मे २०२२ यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान मंत्रालय समोर मुंबई या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा वितरीत करण्यात येणार आहे.यावर्षी या सन्मानाचे आयोजन राज्यस्तरीय करीत असतांना अश्या समारंभातुन शेतकरी बांधवाना जगण्याचे बळ मिळावे हीच या मागची माफक अपेक्षा, या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह,राजीव गांधी यांचीप्रतिमा,प्रशस्तीपत्र,शाल,श्रीफळ असे आहे.या पुरस्काराचा आयोजक या शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व सन्मानासाठी,न्याय हक्कासाठी प्रकाश जी साबळे हे कटीबद्ध आहे.या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ लावणारे खासदार स्व.राजीव सातव यांना प्रत्येक पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करणार आहे आपण यावर्षी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा प्रदान कराव्या ही आग्रहाची विनंती...
धन्यवाद शेतकरी बांधवांनो
*शेती बलवान तर शेतकरी धनवान*
*Save the soil all together*
*श्री अमर तायडे सर (कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती)*
माहीती संकलण
मिलिंद जि गोदे
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:कौतुकास्पद पार्श्वभूमी! राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार नव्हे शेतकरी राजाचा आत्म सन्मान होय
नक्की वाचा:Onion Farming : उन्हाळ्यात कांदा पिकाचे व्यवस्थापण; वाचा या महत्वपूर्ण माहितीविषयी
Share your comments