
पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडचया परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाच्या सुत्रांनी दिला आहे. दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटकची किनारपट्टी दरम्यान अजूनही कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
अरबी समुद्राचा ईशान्य भाग व दक्षिण गुजरातची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात दाबाचा पट्टा असून अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती दक्षिण गुजरात पश्चिम राजस्थानपर्यंत सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. बंगाल उपसागराच्या पश्चिममध्ये आणि उचत्तर आंध्रप्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा पट्टा बिकानेर, जयपूर, सागर, दुर्ग, जगदलपूर आणि दक्षिण - आग्नेय ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिमध्ये भाग व उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरातपर्यंत आहे.
उत्तर प्रदेशाच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान राज्यात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह देशातील इतर राज्यात देखील पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हा पुढे सरकला आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील २४ तासात उत्तरकडील आंध्र प्रदेशातील उत्तरेच्या भागापासून ते तेलगांणा, महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेशात जोरदार पाऊस होणार आहे. यासह कर्नाटकातील किनारपट्टी आणि पूर्वी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड, आसामसह पुर्वेकडील भारताच्या काही भागात आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
Share your comments