1. बातम्या

2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भात पावसाचा अंदाज

मुंबई: बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
 बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील.

या दरम्यान पश्चिम-विदर्भाच्या जवळ असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उर्वरित मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खानदेशात मात्र प्रामुख्याने हलका पाऊस पडेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या दरम्यान ढगाळी वातावरणामुळे या सर्व भागांतील तापमान कमी होतील.

4 जुलै नंतर पुढच्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी होईल. दि. 2-4 जुलै मध्ये नदी-नाल्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी पुरा सारखी स्थिती उद्भविल्यास सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

English Summary: Rainfall forecast in the vidarbha region between 2 and 4 July Published on: 01 July 2019, 07:34 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters