कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होत आहे. सोमवार सकाळपर्यंत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. सध्या कोकणातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे.पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर उद्या वर्धा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मराठावाड्यातील परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील, अशा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील भात पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून, संगमेश्वर तालुक्यातील कापलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले. याबाबत अजूनही कृषी विभागाकडून सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चार दिवसांपुर्वी परिसरात कडक ऊन पडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीस सुरुवात केली होती.
परंतु शुक्रवारी सांयकाळी या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचनाक झालेल्या पावासाने तारांबळ उडाली. कापलेले भात भिजले. खाचरात पाणी साचल्याने भाताच्या लोंब्या भिजल्या. रविवारी सकाळपासून पाऊस सूरू असल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्टतही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. घाटमाथ्यावरीह पावसाच्या बऱ्यापैकी पाऊस पडला. साताऱ्यातील कोरेगाव येथे ३२ मिलिमीचर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर खटाव, इगतपुरी, पलूस या भागातही पावसाच्या सरी पडल्या. मराठवाडा व विदर्भात कडक ऊन पडत असले तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत.
Share your comments