देशातील अनेक राज्यातील हवामान बदलत असलल्याने शेतकऱ्यांना पिकांची चिंता सतावत आहे. पुढील २४ तासात पुर्वेकडील भारतात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक, आणि इतर भागात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जम्मू- काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची अंदाज आहे.
उप- हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्किम मध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात उप हिमालयीन पंश्चिम बंगाल, सिक्कीम , आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर - पश्चिम राजस्थानातील काही भागात पाऊस होऊ शकतो.
येत्या २४ तासातील हवामानाचा अंदाज -
येत्या २४ तासात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, लदाख आणि उत्तराखंडातील काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. आसाम, मेघालय, मिझोराम, आणि मणिपूरातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुर्वकडील राज्यातही पावसाची शक्यता आहे. उत्तर - पश्चिम राजस्थान आणि दिल्ली आणि मध्यप्रदेशाच्या उत्तर व मध्य भागांसह, उप हिमालयीन, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Share your comments