1. बातम्या

राज्यातील काही भागात आज पाऊस होण्याचा अंदाज

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


बंगाल उपसागराच्या पश्चिम भागात आणि आंध्र प्रदेशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामानाची  स्थिती राहणार आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील. उद्यापासून विदर्भात अनेक ठिकाणी उघडीप राहणार असून काही ठिकाणी  पाऊस होईल.

दक्षिण गुजरातची किनारपट्टी व तेलगंणापर्यंत  चक्रवाताची स्थिती  असून ती मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या दरम्यान  आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी  हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊश पडत आहे.  मात्र, रविवारनंतर या भागातील पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्राचा ईशान्य भाग व दक्षिण गुजरातची किनारपट्टी  या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत असून समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर प्रदेशचा आग्नेय भाग परिसर आणि राजस्थानच्या ईशान्य भाग व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिी समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.

दरम्यान देशातील इतर राज्यात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, मध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.  पुढील २४ तासात पश्चिम बंगाल, सिक्किम, आणि पुर्वेकडील भारतातील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. बिहारचा पुर्वेकडील भाग, तामिळनाडू, उत्तरी आंतरिक आणि कर्नाटकातील किनारपट्टी, गोवा, आणि अंदमान व निकोबार द्वीपसमुहातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters