राज्यातील तापमानात वाढ झालेली असताना पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान उन्हाचा चटकाही कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ४३.३ तर जळगाव येथे ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी., नांदेड, विदर्भातील अकोला. अमरावती, येथील तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. पुणेसह नाशिकसाठी बुधवार हा दिवस फारच चटके देणारा ठरला. येणाऱ्या काही दिवसातही या दोन्ही शहारांतील तापमान वाढलेले राहणार आहे. स्कायमेटच्या वृत्तानुसार, गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमधील तापमानाने उच्चाकी गाठत आपला विक्रम नोंदवला आहे. मध्यप्रदेशपासून मध्य महाराष्ट्र, गोवा, अरबी समुद्रपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे आजपासून राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे ,विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आगामी 24-तासांचा अंदाज - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या चोवीस तासांत पावसाच्या कार्यात वाढ होण्याची शक्यता आहे. या भागात हलका ते मध्यम पाऊस असलेल्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उप-हिमालयीय पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाममधील काही भाग आणि मेघालयातही पाऊस तीव्र होईल. या भागात बर्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसतात. उर्वरित ईशान्य राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Share your comments