सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या नुकसान भरपाईपोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी ११४ कोटी ९० आहेत मंजूर करण्यात आले आहेत. राज्यात सततच्या पावसाने गेल्या खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचीही नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी सर्व प्रथम करत सातत्याने लावूनही धरली होती.
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी याबाबत आंदोलन केले होते. जलसमाधी आंदोलनावेळी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई देवू व त्यासाठी भरीव निधीची तरतूद करू, असा शब्द दिला होता.
त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी ११४ कोटी ९० लक्ष रु. मंजूर झाले आहेत. तसेच ११ फेब्रुवारी २०२३ च्या आत्महदन आंदोलनावेळी लाठीचार्ज होवून तुरुंगात जावे लागले त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली होती.
वसुलीला सुरुवात! पीएम किसान योजनेतील पैसे सरकार परत घेणार, तुमचे तर नाव नाही ना ?
जलसमाधी आंदोलनामुळेच बुलढाणा जिल्ह्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी १५७ कोटींची मदत मंजूर झाली होती व आधी मंजूर असे १७४ कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी मिळाले होते, त्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळाली असून अजूनही ५० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत मिळणे बाकी आहे ती मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चंदनाच्या लागवडीतून करोडोंची कमाई, जाणून घ्या..
आता सततच्या पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यास प्रशासनाने सुरवात केली आहे. लवकरच ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांनो या उपकरणाने प्राण्यांचे सर्व रोग ओळखले जातील, वाचा संपूर्ण माहिती
पांढऱ्या कांद्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मिळेल चांगला नफा, जाणून घ्या त्याची योग्य पद्धत..
Share your comments