नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहूल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहूल गांधी यांना सुरु असलेल्या अधिवेशाला संसदेत उपस्थित राहता येणार आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची प्रत आणि इतर कागदपत्रे काँग्रेसने लोकसभा सचिवालयाकडे पाठवली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाची बैठक झाली. त्यानंतर खासदारकी बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरातच्या सुरत कोर्टाने राहूल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहूल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने निकाल देत गांधींची शिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे राहूल गांधींना पुन्हा कधी खासदारकी मिळणार? याबाबत चर्चा रंगली होती.
राहूल गांधी संसदेत हजर
राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतर त्यांना लोकसभेच्या कामकाजात भाग घेतला आहे. तसंच उद्या ८ ऑगस्ट रोजी लोकसभेत सरकार विरुद्धातील अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. या चर्चे दरम्यान राहूल गांधी सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे.
देशभरात काँग्रेस नेत्यांचा जल्लोष
राहूल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आल्यामुळे देशातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिल्लीत काँग्रेसच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करून आणि एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल-ताशा वाजवत एकच जल्लोष केला.मुंबईतही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठा जल्लोष केला.
Share your comments