1. बातम्या

रघुनाथदादा पाटलांचा महावितरणला इशारा, म्हणाले आता शेतकऱ्यांची वीज तोडाल तर...

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, याचे कारण म्हणजे महावितरणकडून विजतोडणी सध्या केली जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी उध्वस्त झाला

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Raghunathdada Patil

Raghunathdada Patil

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, याचे कारण म्हणजे महावितरणकडून विजतोडणी सध्या केली जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी उध्वस्त झाला असून यातच हे सरकार वसुलीला लागले आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून महावितरण आणि राज्य सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. अशातच आता शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी महावितरणला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे आता तरी महावितरणला जाग येईल का हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे.

याबाबत रघुनाथ पाटील म्हणाले की, सरकारने महावितरणला वेळोवेळी दिलेली अनुदाने तेवढ्या रकमेची वीज महावितरणकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही. शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करून आपली विना परवानगी, विना नोटीस, वीज तोडणीस विरोध करावा. जर अशा प्रकारची बेकायदेशीर कारवाई होत असेल तर शेतकरी संघटनेशी संपर्क साधून शेतकरी संघटनेकडून जशास तसे उत्तर महावितरणला दिले जाईल असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी महावितरणला दिला आहे. यामुळे आता या संघर्षात त्यांनी उडी घेतली आहे. यामुळे हे आंदोलन अजूनच तीव्र होण्याची शक्यता आहे.

तसेच त्यांनी उसाच्या चालू गळीत हंगामावर देखील भाष्य केले आहे, ते म्हणाले की, चालू गळीत हंगाम अर्ध्यावर आला असला तरी अजून बहुतांशी शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. तसेच तोडीसाठी मजुरांना, मुकादम, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना पैसे जेवण, दारूपार्ट्या द्यावा लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हायची असेल तर केंद्रीय साखर आयुक्त तुटेजा, नाबार्डचे तत्कालीन अध्यक्ष यशवंतराव थोरात आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार सी रंगराजन यांनी सांगितलेल्या दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट कायमची रद्द करावी लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच दोन इथेनॉल कारखान्यामध्ये अंतराची अट असता कामा नये तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. गुजरात, उत्तर प्रदेश धर्तीवर जर ऊसदर घ्यायचा असेल तर याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे आता सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या सगळ्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

English Summary: Raghunathdada Patil's warning to MSEDCL, said if farmers' electricity is cut off now ... Published on: 20 January 2022, 03:32 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters