1. बातम्या

Rabbi Wheat Sowing : रब्बी हंगाम विशेष : जिरायत गव्हाची पेरणी कशी करावी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत निफाड गहू संशोधन केंद्रातर्फे नेत्रावती हा कोरडवाहू भागासाठी अनुकूल वाण २०११ मध्ये प्रसारित करण्यात आला.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rabbi Season Update

Rabbi Season Update

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अविनाश गोसावी

गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून दयावे.जिराईत गव्हाची पेरणी ऑक्टोबर च्या दुसऱ्या पंधरवड्यातकरावी.पाऊस बंद झाल्यावर व जमिनीत योग्य वाफसा आल्यावर पेरणी करावी.पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे.बी फोकून न देता पाभरीने पेरावे.पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर २० से.मी. ठेवावे.बियाणे ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.उभी आडवी पेरणी करू नये.एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

जिराईत पेरणीसाठी पंचवटी (एनआयडीडब्लू-१५), शरद(एनआयएडब्लू-२९९७-१६) व मर्यादित सिंचनाची व्यवस्था असल्यास नेत्रावती (एनआयएडब्लू-१४१५)या वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅमथायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा +१.२५ ग्रॅम कार्बेन्डॅझिम(७५ डब्लूपी) ची बीजप्रक्रिया करावी.त्यानंतर गव्हाच्या १० ते १५ किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व स्फुरद विरघळवणारे जीवाणूंची बीजप्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करतांना गुळाच्या थंड द्रावणाचा (१०० ग्रॅम गुळ प्रति लिटर पाणी)आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा.बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे पेरणीपूर्वी काही वेळ सावलीत वाळवावे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत निफाड गहू संशोधन केंद्रातर्फे नेत्रावती हा कोरडवाहू भागासाठी अनुकूल वाण २०११ मध्ये प्रसारित करण्यात आला. पाण्याची एक सोय असली तरी त्याची लागवड शक्य आहे.कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी १८ ते २० व मर्यादित सिंचन असल्यास २५ ते ३० क्विंटल ऊत्पादनक्षमता या वाणात आहे. उत्तम सरबती वाण,दाणे मध्यम व आकर्षक प्रथिनांचे प्रमाण १२ टक्के,तांबेरा रोगास प्रतिकारक चपातीसाठी उत्तम वाण आहे.

जिरायती गव्हास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) म्हणजेच सर्वसाधारणपने दोन गोणी युरिया आणि २० किलो स्फुरद (१२५ किलो सिंगल सुपर फॉसपेट) म्हणजेच २.५ गोण्या सिंगल सुपर फॉसपेट दयावे. पेरणीनंतर तीन आठवड्यानी खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे.जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओल्याव्यावर होते.एक पाण्याची उपलब्धता असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी दयावे.


पंचवटी ( NIAW-15)
*प्रसारणाचे वर्ष -२००२
*जिरायतीत वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत बन्सी वाण
*टपोरे, चमकदार व आकर्षक दाणे
*प्रथिने १२ %
*तांबेरा रोगास प्रतिकारक
*शेवया, कुरडई व पास्ता/माकॅरोनीसाठी उत्तम
*पक्व होण्याचा कालावधी १०५ दिवस
*उत्पादनक्षमता १२ ते १५ क़्विंटल/हेक्टरी


नेत्रावती (NIAW 1415)
 प्रसारणाचे वर्ष – २०१०
 जिरायतीत किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी शिफारसीत सरबती वाण
 तांबेरा रोगास प्रतिकारक
 प्रथिने १२% पेक्षा जास्त
 चपातीसाठी उत्तम
 सूक्ष्मअन्नद्रव्ये (उच्च पोषणमुल्ये) लोह ४३ प्रदभा, जस्त ५५.५ प्रदभा (प्रति दशलक्ष भाग)
 पक्व होण्याचा कालावधी जिरायतीत १०५ दिवस व एका ओलिताखाली ११० दिवस
 उत्पादनक्षमता :जिरायती १८ ते २० क़्विं./हे.
 एका ओलिताखाली २७ ते ३० क़्विं./हे.

एम एस सी एस ४०२८ ( MACS 4028) (बन्सी गहू)
 प्रसारण वर्ष २०१८
 जिरायत वेळेवर पेरणीसाठी योग्य
 मध्यम उंचीचा वाण ( उंच ७५ से.मी.)
 दाणा मोठा,आकर्षक व चमकदार
 खोडावरील व पानावरील ताबेरा रोगास प्रतिकारक
 लवकर पक्व होणारा (१०२ दिवस ) वाण
 १००० वाण्याचे वजन ४७ ग्रॅम
 सूक्ष्म पोषणतत्वे जसे जस्त ४०.३ पी.पी.एम,लोह ४६.१ पी.पी.एम तसेच प्रथिनांचे प्रमाण १४%
 पास्तासाठी हा वाण उपयुक्त
 सरासरी उत्पादन १९.३ क्विं/हे.

जिरायती गहू लागवड तंत्रज्ञान
जमिन : मध्यम ते भारी जमिन, पाण्याचा चांगला निचरा होणारी
पेरणीची योग्य वेळ : ऑक्टोबर चा दुसरा आठवडा
पेरणीचे अंतर : २० से.मी.
बियाणे : ७५ ते १०० किलो प्रति हेक्टरी
बीजप्रक्रिया : 1) प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा+१.२५ ग्रॅमकार्बेन्डॅझिम(७५ डब्लूपी) व
2) २५ ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅकटर व पीएसबी जीवाणूंची बीजप्रक्रिया
रासायनिक खते : ४०किलो नत्र(८७ किलो युरिया)आणि २० किलो स्फुरद(१२५ किलो एसएसपी)
जिरायती वाण : पंचवटी (एनआयडीडब्लू-१५),शरद (एनआयएडब्लू-२९९७-१६)
जिरायती व मर्यादित सिंचनाची व्यवस्था : नेत्रावती (एनआयएडब्लू-१४१५)

लेखक- डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो.९४०४०३२३८९
डॉ. अविनाश गोसावी, सहयोगी प्राध्यापक, मृद शास्त्र कृषि महविद्यालय, पुणे

English Summary: Rabi season special update How to sow field wheat Published on: 17 October 2023, 10:40 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters