यंदाच्या वर्षी पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन हे घसरले आहे. या नुकसातून सावरून शेतकरी राजा रब्बी हंगामाला सुरवात केली आहे.मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील ज्वारी हे प्रमुख पीक आहे. ज्वारी उत्पादनात वाढ कशी करावी आणि याबरोबरच शेतकऱ्यांनी दुहेरी फायदा कसा घ्यावा या विषयी जाणून घ्यायलाच हवे.ज्वारी हे गरीब कुटुंबातील खाद्यमधील मुख्य अन्न आहे. तसेच ज्वारी मध्ये तांदळा पेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळं बहुतांश सर्वच लोक आहारात ज्वारी चा उपयोग करतात. तसेच या ज्वारी कडबा सुद्धा जनावरांना खाण्यासाठी चांगला आणि पोषक असतो.
रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी कशी करावी:-
महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारी हे पीक 3 वेगवेगळ्या हंगामात घेतले जाते. परंतु खर तर ज्वारी हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. पावसाळी हंगामात पेरलेली ज्वारी ही फक्त ओल्या चाऱ्यासाठी लावली जाते. रब्बी हंगामात ज्वारी पेरनी साठी रानात पुरेशी ओल असली पाहिजे. जर का ओल नसल्यास पेरणी नंतर ज्वारी ला पाणी द्यावे.
ज्वारीसाठी उपयुक्त जमीन:-
ज्वारी या पिकासाठी काळी, मध्यम काळी किंवा मुरमाड स्वरूपाची जमीन उपयुक्त असते. ज्या क्षारयुक्त जमिनीत 5.5 पर्यँत pH आहे अश्या स्वरूपाच्या जमिनीत ज्वारी पिकाची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. हलक्या प्रतीच्या जमिनीत सुद्धा ज्वारी पीक चांगले येते परंतु त्यासाठी वेळेवर पाणी आणि खतांचा वापर करणे आवश्यक असते.तसेच ज्वारी पेरणी चा दुहेरी फायदा म्हणजे आपण ज्वारी मध्ये सुद्धा आंतरपीक घेऊ शकतो. यात आंतरपीक म्हणून तूर, जवस, करडई,चवळी, उडीद, मूग,मटकी,अंबाडे यांचे सुद्धा उत्पन्न घेऊ शकतो. आणि ज्वारी बरोबर भरघोस नफा मिळवू शकतो.
ज्वारी उपडणासाठी आवश्यक असणारी मशागत:-
रब्बी हंगामात ज्वारी पेरणी नंतर बरोबर 1 महिन्यात ज्वारी ची खुरपणी किंवा कोळपणी करावी. आणि त्यानंतर युरिया टाकून पाणी द्यावे. यामुळे ज्वारी पटापट वाढण्यास मदत करते. ज्वारी ला कमीत कमी 2 वेळा तरी कोळपणी या खुरपणी करणे गरजेचे आहे.
खतांचा डोस:-
शेती चा सर्वात आवश्यक घटक हा खत माती आणि पाणी हा असतो. पेरणी च्या अगोदर रानामध्ये शेणखत घालावे त्यामुळं पीक जोमदार येते आणि खुरपणी नंतर युरिया घालावा. त्यामुळे पीक लवकर वाढीस लागते.
ज्वारी काढणी:-
ज्वारी हे पेरणीपासून 5 महिन्यात काढायला येते. 5 महिन्यात ज्वारी चे दाणे टणक झाले की ज्वारी ची काढणी करायला सुरुवात करावी. किंवा कणसे खुडायला सुरवात करावी. खुडणी नंतर निघालेली कणसे योग्य पद्धतीने वाळवून त्याची मळणी करावी. मळणी यंत्राच्या साह्याने एका तासात 6 ते 8 क्विंटल ज्वारी ची मळणी केली जाते.सर्वसाधारण पणे ज्वारी चे हेक्टरी उत्पन्न हे 4 ते 5 क्विंटल एवढे असते. आणि रब्बी हंगामात ज्वारी चे उत्पन्न 7 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं मिळू शकते. तसेच याबरोबर कडब्याचे सुद्धा उत्पन्न मिळवून भरपूर फायदा मिळवू शकतो.
Share your comments