1. बातम्या

Rabbi season: रब्बी मका लागवड तंत्रज्ञान

राज्यात यंदाच्या वर्षी मान्सूनचे झालेले उशीरा आगमन, विखुरलेल्या स्वरुपात, असमतोल पडलेला पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात पडलेला पाऊस मोठ्या खडकामुळे, खरीप हंगामातील मक्याचे उत्पादन निश्चितपणे घटणार असल्याने, राज्यातील पशुधनाची आणि कुकुट पालनची संख्या लक्ष्यत घेता उपलब्ध पाण्यात रब्बी हंगामातील मका लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Rabbi season Update

Rabbi season Update

ऐश्वर्या राठोड, डॉ. आदिनाथ ताकटे

राज्यात यंदाच्या वर्षी मान्सूनचे झालेले उशीरा आगमन, विखुरलेल्या स्वरुपात, असमतोल पडलेला पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात पडलेला पाऊस मोठ्या खडकामुळे, खरीप हंगामातील मक्याचे उत्पादन निश्चितपणे घटणार असल्याने, राज्यातील पशुधनाची आणि कुकुट पालनची संख्या लक्ष्यत घेता उपलब्ध पाण्यात रब्बी हंगामातील मका लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

राज्यात पक्षी खाद्याकरिता ४९%, पशु खाद्याकरिता १७%, अन्न प्रक्रिया ७%, स्टार्च निर्मितीकरिता १७% व इतर ३% मका पिकाचा वापर होतो. राज्यात गतवर्षी १२.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती त्यापासून ३५.३४ लाख टन उत्पादन मिळाले. यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे लागवड क्षेत्रात घाट झाली (८.८५ लाख हेक्टर) असुन ऑगस्ट मध्ये पडलेला पावसाच्या खंडामुळे सर्वसाधारपणे ३५% उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

मका राज्यातील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता (२०१७-२०२२) -
वर्ष क्षेत्र      (लाख हेक्टर)     उत्पादन (लाख टन )    उत्पादकता(किलो/हेक्टर)
२०१७-१८        १०.६४            ३१.२५                        २९३७
२०१८-१९         ९.३७             १७.६६                        १९०६
२०१९-२०         ११.२७            १९.६०                        १७४०
२०२०-२१         १२.०२            ३५.८८                        २९८३
२०२१-२२         १२.९७            ३५.३४                        २७३०
२०२२-२३          ८.८५               -                             -

रब्बी हंगामात मका पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी करावयाची उपाययोजना -
शेतकऱ्यांना मका बियाणे व इतर निविष्ठाचा पुरवण करणे
योग्य वेळी पेरणी करणे (१५ ऑक्टोबर - १५ नोव्हेंबर)
संतुलित खातमात्रेचा अवलंब
रोग व किडीचे नियंत्रण
किमान आहारभुत किमतीमध्ये वाढ

हंगाम निहाय मका खालील क्षेत्र -
  वर्ष            क्षेत्र ‘००’ हेक्टर 
                खरीप      रब्बी     उन्हाळा 
२०१७-१८     ६९५०      ३३१९     ३५०
२०१८-१९     ७०८०      २०१४     १७१
२०१९-२०     ७७१७      २९८०    ५७०
२०२०-२१     ८०९९       ३३१६    ६१६
२०२१-२२     ९७३४       ३६२५    ६१६
२०२२-२३     ८८५०           -      -
हवामान - 
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानात येणारे पीक आहे . या पिकाच्या उगवणीसाठी १८ डिग्री सेल्सियस तापमान व विकासासाठी २५ ते ३० सेल्सिअस तापमान लागते. ३५ अंश से. पेक्षा अधिक तापमान असल्यास पीक उत्पादनात घट येते.
जमीन - 
रब्बी मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय पदार्थ आणि अधिक जलधारणाशक्ती असणारी जमीन निवडावी. चोपण किंवा चिबड जमिनीत या पिकाची या पिकाची लागवड करू नये, त्याचबरोबर दलदलीची जमीन सुद्धा या पीक लागवडीसाठी  टाळावी.
पूर्वमशागत -
जमिनीची खोल नांगरट करावी. तसेच पिकांची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिळतो व जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची गरज भासत नाही.
सुधारित वाण -
सुधारित वाणांचा वापर केल्यास अधिक उत्पादन मिळते.
मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात.
विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याच्या संमिश्र व संकरीत जाती उपलब्ध असून पाऊस आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी.
महाराष्ट्रा करिता शिफारस केलेल्या संकरीत आणि संमिश्र वाणांचा तपशील - 
१. उशिरा पक्व होणारे वाण -
संकरीत वाण - पी. एच. एम.-१ , पी.एच.एम.-३ , बायो -९६८१
संमिश्र वाण - प्रभात , शतक ९९०५ 
२. मध्यम कलावधीत पक्व होणारे वाण
संकरीत वाण - डी. एच. एम.-११७, डी. एच. एम.-११९, राजर्षी, फुले महर्षी, फुले उमेद, फुले चॅम्पियन
संमिश्र वाण - करवीर, मांजरी, नवज्योत
३. लवकर पक्व होणारे वाण - 
संकरीत वाण - जे. एच-३४५९, पुसा हायब्रिड-१. जे. के. -२४९२ 
संमिश्र वाण - पंचगंगा, प्रकाश, किरण
४. अति लवकर पक्व होणारे वाण -
संकरीत वाण - विवेक-९, विवेक-२१, विवेक-२७
संमिश्र वाण - विवेक-संकुल
५. चार पिकासाठी - 
संमिश्र वाण - आफ्रिकन टॉल, प्रताप चारी-६
६. मधु मका - 
संकरीत वाण - फुले मधू 
शेतकऱ्यामध्ये प्रसिद्ध असणारे खाजगी वाण -
पी ६६९३, पी ६५०३, पी ६५२४, डी. के. सी. ९१४१, डी. के. सी. ९१४४, एन. के. ६२४०, एन. के. ६५४०, ५१०१ सोना, ए. डी. व्हि. ७५६, ए. डी. व्हि. ७५९, क्रांती, विराट, शक्ती ९१० .
पेरणीची वेळ आणि पेरणीची पद्धत - 
रब्बी हंगामातील मका पिकाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान करावी. या पिकासाठी १५-२० किलो बियाणे प्रती हेक्टरी तसेच चारा पीकासाठी ७५ किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे. या पिकाची पेरणी टोकण पद्धतीने करावी व दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवावे. रब्बी हंगामात मक्याची पेरणी ६० सें. मी. अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एका बाजूला २० सें. मी. अंतरावर २ बिया ४-५ सें. मी. खोल टोकण करून करावी.
 
बीजप्रक्रीया -
पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे, म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते.तसेच अँझोटोबक्टर जीवाणू संवर्धन २५ ग्रॅम किंवा १०० मिली प्रति किलो बियाण्यास बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
खत व्यवस्थापन -
मक्याच्या अधिक धान्य उत्पन्नासाठी संतुलित रासायनिक खतांचा वापर करावा. मका पिकास पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र ( सर्वसाधाणपणे दोन गोण्या युरिया), संपुर्ण स्फुरद ६ किलो ( ६.५ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट) व पलाश ६० किलो (१.२५ गोणी म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. 
पीक पेरणी नंतर ३० दिवसानी ४० किलो नत्र (दोन गोण्या युरिया) व ४०-४५ दिवसांनी उर्वरीत ४० किलो नत्र (दोन गोण्या युरिया) द्यावे. 
पीक ३०-३५ दिवसाचे आल्यावर १९:१९:१९ या विद्राव्य खतांची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी २० ते २५ किलोग्रॅम झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे.
पीक पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी फुले मायक्रो-२ ५० या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फावारणी केल्यास उत्पादनात वाढ होते त्यासाठी पीक ३० दिवसाचे असताच ५० मिली व ४५ दिवसाचे असताना १०० मिली फुले मायक्रो-२ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अन्नद्रव्ये (प्रति हेक्टर किलोग्रॅम) धान्य मकासाठी - 
रासायनिक खते द्यावयाची वेळ        नत्र (युरिया)      स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट)     पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)
                                                       
पेरणीच्या वेळी                          ४० (८८)                ६० (३७८)                            ४०(६८)
पेरणीनंतर ३० दिवस                    ४० (८८)                    --                                   --
पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी            ४० (८८)                    --                                   --
एकूण                                   १२० (२६४)              ६० (३७८)                             ४० (६८)
पेरणीनंतर घ्यावयाची काळजी -
पक्षी राखण - रब्बी हंगामात पेरणीनंतर हे पिक ८ ते १० दिवसात उगवून येते. पीक उगवत असताना पक्षी खाण्यासाठी कोवळे कोंब वेंचत असतात त्यामुळे रोपांची संख्या कमी होते व  उत्पादनात घट होते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच पीक दुधाळ असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशावेळी देखील पक्षी राखण आवश्यक असते.
पेरणीनंतर घ्यावयाची काळजी - 
पक्षी राखण - रब्बी हंगामात पेरणीनंतर हे पिक ८ ते १० दिवसात उगवून येते. पीक उगवत असताना पक्षी खाण्यासाठी कोवळे कोंब वेंचत असतात त्यामुळे रोपांची संख्या कमी होते व  उत्पादनात घट होते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच पीक दुधाळ असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशावेळी देखील पक्षी राखण आवश्यक असते.
नांग्या भरणे / विरळणी करणे - मका उगवणीनंतर ८-१० दिवसांनी विरळणी करुन एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी. त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरीत नांग्या भराव्यात.
पाणी व्यवस्थापन - मका पिकाच्या महत्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे.
पिकाला पाणी देण्याचे महत्वाच्या एकूण ४ अवस्था -  
१. रोप अवस्था - २५-३० दिवसांनी
२. तुरा बाहेर पडताना - ४५-५० दिवसांनी
३. फुलोऱ्यात असताना - ६०-६५ दिवसांनी
४. दाणे भरणेचेवेळी - ७५-८० दिवसांनी
टीप  - अनियमित पावसाच्या भागात पाण्याचा ताण असलेल्या काळात ०.२ टक्के थायोयुरियाची (नर व मादी) पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते. अश्याप्रकारे रब्बी मका पिकाची लागवड केले असता उंच प्रतीचा आणि जास्त उत्पादन मिळते. 
मका पिकांची संधी -
वेगवेगळ्या हंगामामध्ये लागवड 
विविध हवामानात अधिक उत्पादन  
वातावरणातील बदलावर उत्तम पर्याय 
वैविध्यपूर्ण उपयोगिता 
विविध उद्योगासाठी कच्चा माल 
मानवी आहारातील मोठ्या प्रमाणात वापर 
पशुपक्षी, खाद्य प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर 
लेखक - ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,  मो.नं –   ८४११८५२१६४
डॉ. आदिनाथ ताकटे, मृदा शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती,  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मो. नं -९४०४०३२३८९
English Summary: Rabbi Corn Cultivation Technology Published on: 20 October 2023, 04:43 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters