1. बातम्या

दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई

मुंबई: दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दूध भेसळीस सहकार्य करणाऱ्या किंवा कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दूध भेसळीस सहकार्य करणाऱ्या किंवा कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधातही कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील दूध स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर विधानभवनातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीत श्री. रावल बोलत होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) श्री. पवार, सहआयुक्त श्री. देसाई यांनी राज्यातील दूध भेसळीबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही व भेसळ रोखण्याबाबत केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत राज्यात 832 नमुने घेण्यात आले. त्या पैकी 546 नमुने प्रमाणित घोषित झाले असून 176 नमुने कमी दर्जाचे व 4 नमुने मिथ्याछाप घोषित करण्यात आले आहेत. उर्वरित 106 नामुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती या वेळी अधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी अधिकाऱ्यांना निर्देशित करताना श्री. रावल म्हणाले, दूध हा सर्व जनतेच्या आहारातील सर्वाधिक महत्त्वाचा अन्नपदार्थ असून दुधाच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष होऊ नये. दूध भेसळीस सहकार्य करणाऱ्या किंवा कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधातही कडक कार्यवाही करण्यात येईल. दूध उत्पादकांची बैठक घेऊन त्यांना पुरवठा साखळीबाबत सतर्क करणे, दुधाच्या शुद्धतेबाबत जनजागृती करणे, जागेवरच खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅन सुरू करणे व या कामासाठी अधिकचे मनुष्यबळ निर्माण करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

English Summary: Quick action on Milk Producing Company in milk adulteration case Published on: 30 June 2019, 08:05 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters