सध्या देश पुन्हा एकदा नोटबंदीला सामोरे जाणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. यापुढे या नोटा छापल्या जाणार नाहीत. तसेच या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत कायदेशीरित्या वैध राहतील. त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार आहेत.
मात्र त्यापूर्वी बँकेतून बदलून घ्याव्या लागणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राहकांना २ हजार रुपयांच्या नोटा देणं तातडीने थांबवा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिले आहेत.
दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा 1934 च्या कलम 24 (1) अंतर्गत आणण्यात आली. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर चलनाच्या गरजेमुळे या नोटा चलनात आल्या. दुसऱ्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देश फोल ठरला.
त्यामुळे २०१८-२०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. क्लिन नोट पॉलिसी'च्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. भारतीय रिजर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करणार असल्याची घोषणा केलीये.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल..
आता मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळणार, असा घ्या लाभ..
ज्यांनी पैसे बुडवलेत त्या ऊसतोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई होणार! पोलीस प्रमुखांची माहिती..
Share your comments