मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रिया झाल्याने घरीच विश्रांती घेत होते. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा मुंबईत घेतली.
राज ठाकरे आणि मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो. त्यांनी एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. आपण टोलचं आंदोलन करून 65 ते 67 टोल बंद केले.
माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके (Toll plaza) बंद करतो, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. टोलवरून त्यांनी महाविकास आघाडीसह भाजपावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे यांची करुणा शर्मा यांनी भेट घेऊन मांडली आपली व्यथा, आता धनंजय मुंडे अडकणार?
राज ठाकरे म्हणाले, सेना भाजपाच्या (BJP) जाहीरनाम्यात म्हटलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करू. त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार.
मला वाटतं या गोष्टी तुम्हाला जिल्हा तालुक्यात शहरात बोलतता तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले. तुमच्या पक्षांनी काय केलं. आश्वासन देऊनही तुम्ही बंद केलं नाही हे सांगितलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
मोठी बातमी! आता 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट लावा, केंद्राने दिली परवानगी..
टोलवर पैसा गोळा करतो. त्यातून ब्रिज आणि रस्त्याची रक्कम गोळा करतात. आपला प्रश्न होता हे टोल किती वर्ष राहणार आणि किती पैसे गोळा होतात. ती कुणाकडे जातो.
ही कॅश रोज कुणाकडे जाते. त्याचं पुढे होतं काय. याची कोणतीही उत्तरं आजपर्यंत सरकारकडून दिली गेली नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'
Share your comments