राज्यात शिंदे गटाच्या आमदारांनी बंद करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. यावेळी अनेक आमदारांनी मित्रपक्षांवर टीका केली. उद्धव ठाकरेंपासून हे आमदार वेगळे झालेले असले तरी उद्धव ठाकरे यांच्यावरील त्यांचे प्रेम काही कमी झाले नाही.
अनेकदा शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंबद्दल आदर दाखवत असतात. या सत्ताबदलावेळी चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील देखील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदराने बोलत असतात. डोंगर, झाडी, हाटील यामुळे ते चर्चेत आले होते.
आता शहाजी बापू पाटील यांनी थेट मातोश्रीच्या सुखसमृद्धीसाठी गणरायाला साकडे घातले आहे. मातोश्रीच्या दारात सुख शांती दाबून दे, रश्मी वहिनींना सुखी आनंदी ठेव, अशी प्रार्थना शहाजी बापू पाटील यांनी गणरायांकडे केली आहे.
आता कारखान्यावर चकरा मारणे होणार बंद! आता शेतात बसून होणार उसाची नोंदणी
यामुळे ते उद्धव ठाकरे यांना सोडून जरी गेले असले तरी त्यांच्या मनात आजही आदर आहे. शहाजी बापू पाटील यांनी अचानक केलेल्या या प्रार्थनेचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत. यामुळे याची चांगलीच चर्चा सुरू आहे.
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या राहत्या वाड्यामध्ये गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना शहाजी बापू पाटील यांनी वरील वक्तव्य केले आहे.
एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये
तसेच यंदा पाऊस पडू दे आवर्षणग्रस्त भागात पाणी मिळवण्यासाठी यंदा पाऊस पडू दे. बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे. पीकपाणी जोरात होऊ दे. राज्यात सुख शांती नांदू दे, असेही शहाजी पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या: १ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल; थेट होणार खिश्यावर परिणाम...
Share your comments