मुके प्राणी म्हटले म्हणजे तेसुद्धा आपल्या वैशिष्ट्यांमुळे इतर प्राण्यांपेक्षा उठून दिसतात. अशा वेळी त्यांची एक वेगळाच थाट असतो व अशा प्राण्यांची चर्चा पंचक्रोशीतच नाहीतर दूरदूरपर्यंत ऐकायला मिळते.
असाच एक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी, वजन आणि देखणे पणामुळे साकोली तालुक्यातील चांदोरी ग्रामपंचायतीचे सदस्य देवाजी हात झाडे यांच्याकडे 25 महिने वयाचा पुष्पा नावाचा एक बोकड आहे. सध्या हा बोकड परिसरात चर्चेचा विषय ठरला असूनत्याला खरेदी करण्यासाठी एकच झुंबड चांदोरी गावात उडत आहे.
नक्की वाचा:तब्बल 736 दिवसांनी सर्वच नागरिकांची मास्कपासून मुक्ती, ठाकरे सरकारची मोठी घोषणा
पुष्पा बोकड ची वैशिष्ट्ये
या बोकडाचे वजन तब्बल दीडशे किलो असून त्याची अंगकाठी विशालकाय अशी पाच फूट उंच आणि पाच फूट लांब असे आहे.भंडारा जिल्ह्यांमध्ये जर बघितले तर एवढा अंगकाठी असणारा हा एकमेव बोकड आहे.मागील काही दिवसांमध्ये पुष्पा सिनेमा ज्याप्रमाणे सगळीकडे प्रसिद्ध झाला त्याच प्रमाणे हा भंडारा जिल्ह्यातील पुष्पा बोकड प्रसिद्ध झाला आहे.पुष्पा बोकडांना पाहिल्यानंतर अंगात थरकाप उडतो असाच त्याचा अवतार आहे.
त्याचा दररोज मसाज केला जातो. त्याला दररोज आराम मध्ये एक कुडवा भर तांदूळ व कुडवा भर गहू लागतो.जेव्हा पुष्प बोकडाची स्वारी घराबाहेर निघते तेव्हा रस्त्याने चालत असताना समोरून येणारे लोकसुद्धा त्याला मोकळी वाट करून देतात.
पुष्पा नामक साउथ पिक्चर मधील अल्लू अर्जुन प्रमाणे पुष्प बोकडचा दरारा भंडार या जिल्ह्यात आणि परिसरात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या बोकड ला खरेदी करण्यासाठी चांदोरी गावांमध्ये बरेच खरेदीदार येत असून बोकड मालकाने त्याची किंमत दोन लाख रुपये ठेवली आहे.
या किमतीव पुष्पा चे मालक देवाजी हातझाडेहे ठाम आहेत.पाच फूट लांब व पाच फूट उंच असलेला हा महाकाय बोकड बघण्यासाठीघरी गावामध्ये एकच गर्दी उडत आहे.त्यामुळे एखाद्यासेलिब्रिटी ला लाजवेल अशा प्रमाणे पुष्पा आता भंडारा जिल्ह्यात फेसबूक व इंस्ताग्रम वर सुद्धा फेमस झाला आहे.
Share your comments