पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज शेतकरी बांधवांमध्ये मोठा विश्वासाचा मानला जातो. गेल्या वर्षांपासून पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकरी बांधवांच्या फायद्याचा ठरला असून अचूक अंदाजासाठी पंजाब रावांचे अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजत आहे.
येत्या पावसाळ्याबाबतदेखील नुकताच पंजाब रावांचा अंदाज सार्वजनिक झाला आहे. पंजाबराव यांच्या मते, यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस होणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचा पंजाबराव यांचा अंदाज शेतकरी बांधवांसाठी नवसंजीवनी देण्याचे कार्य करणार आहे. त्यांनी पाऊस मुबलक प्रमाणात होणार त्यामुळे शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात उत्पादनवाढीच्या अनुषंगाने आत्ता पासूनच प्रयत्न करावेत असा सल्ला दिला आहे.
शेतकरी बांधव पावसाच्या अंदाजावरच खरिपातील पेरा करत असतो. विशेष म्हणजे पंजाबराव यांचा गेल्या अनेक वर्षांपासून हवामानाचा अंदाज अचूक येतं असल्याने शेतकरी बांधवांना याचा फायदा होत आहे.
- संबंधित बातम्या:-
- बातमी कामाची! शेतीतून लाखों रुपयांचे उत्पन्न कमवायचे असेल तर 'या' पिकाची लागवड कराच….
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! एक एकर क्षेत्रातून कमवायचे असतील लाखों रुपये तर करा 'या' पिकाची शेती
- Pm Kisan: e-KYC करण्यासाठी मुदतवाढ पण; ई-केवायसी केलेली नसेल तर मिळेल का 11वा हफ्ता?
पंजाबराव डख यांनी अकोल्यात एका कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असताना पावसाचा अंदाज सांगितला. या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून येत्या खरिपात चांगल्या उत्पादनाची त्यांना आता आस लागली आहे. पीक पेरणीपूर्वी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना याचा विशेष फायदा होतो. पंजाब रावांनी आता पावसासंबंधी अंदाज जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी संपली आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडलेला पाऊस खरिपातील पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे शास्त्रज्ञद्वारे सांगितले जाते. यावर्षी जरी हवामान तज्ञांनी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहेत तरीदेखील शेतकरी बांधवांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरू करावी असा सल्ला यावेळी दिला जात आहे. एकंदरीत पंजाबरावांचा अंदाज शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Share your comments