नवी दिल्ली- पंजाब विधानसभेची निवडणूक काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदसिंग (amarinder singh) यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अपमानित केल्यामुळे राजीनामा देत असल्याचे व्यक्तव्य सिंग यांनी केले होते.
राजकीय जाणकारांच्या मते, मुख्यमंत्री सिंग यांच्या राजीनाम्यामागे दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे कनेक्शन दडले आहे.
शेतकरी आंदोलन ते पक्षांतर्गत बंड जाणून घेऊया राजीनाम्यागील प्रमुख कारणे:
1. शेतकरी विधायकाला (farmer bill) विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचे दीर्घकाळ आंदोलन सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची मूक प्रेक्षक अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. आंदोलनाला थेट स्वरुपाचा विरोध मुख्यमंत्री सिंग यांनी केलेला नाही. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार विरोधात दबावगट निर्माण करण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचे सांगितले होते. तसेच शेतकरी आंदोलनावरुन पंजाबमधील परिस्थिती अशांत करू नका असेही वक्तव्य केले होते. शेतकरी आंदोलकर्त्यांना पंजाब सोडण्याचे विधानावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली होती.
Share your comments