सध्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे तसेच हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यासोबतच लक्षद्वीप आणि कर्नाटक किनारपट्टी च्या परिसरात द्रोनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचा एकंदरीत परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
यामध्ये पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्यानंतर रविवार पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज पुण्यासह एकूण बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
. याठिकाणी काही तासात विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे.आज पुणे सातारा, सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, लातूर,सोलापूर,उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या बारा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या पुण्यासह सातारा, सांगली,कोल्हापूर,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे.
याठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रविवारी पुणे,रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
Share your comments