पुणे बाजार समितीमध्ये अडते असोसिएशनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. याला पायबंद घालण्यासाठी संचालक मंडळाने अडत्यांनी दोन मदतनीस असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले होते.
असे असताना या आदेशाला केराची टोपली दाखवत विरोध केला होता. मात्र बाजार समितीने सातत्याने स्मरणपत्रे देऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर दीड महिन्याने वाट बघून प्रशासनाने १ ऑगस्टपासून कारवाईला प्रारंभ करत ९६ अडत्यांवर केली.
येथील फळे-भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने काढलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणीला अखेर मुहूर्त उजाडला. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पूरग्रस्तांसाठी कंबर कसून उभे आहोत, स्वाभिमानी कडून मदतीचा हात..
बाजार समिती प्रशासनाला न जुमानणाऱ्या अडत्यांवर अखेर दंडात्मक कारवाईला प्रारंभ झाला. मंगळवारी ८२१ अडत्यांपैकी ९६ अडत्यांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावत जीएसटीसह १ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, बाजार समितीमध्ये अडते असोसिएशनसह बाजार आवारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडतीच्या मूळ व्यवसायातून निवृत्ती घेत, इतर व्यवसायात बस्तान बसविले आहे. यामुळे कारवाईची मागणी केली जात होती.
शेतकऱ्यांनो शिमला मिरची शेती करणार असाल तर जाणून घ्या रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय
तसेच बाजार समितीमधील गाळे पाचपेक्षा जास्त डमी अडत्यांना बेकायदा पद्धतीने भाडेतत्त्वावर देत, केवळ भाडे घेण्याचा उद्योग सर्रास झाला आहे. यामुळे कारवाई केली जात आहे.
शेतकऱ्यांनो पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस, सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी..
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचं डाेकं ठिकाणावर आणणार
Share your comments