1. बातम्या

पुणे बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदार यादी प्रसिद्ध, इच्छुकांची पळापळ

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Pune Bazar Samiti election

Pune Bazar Samiti election

गेल्या काही वर्षांपासून पुणे बाजार समितीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता 19 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचे धुमशान लवकरच सुरू होणार आहे. याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी प्रसिद्ध केली आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाजार समितीसाठी 18 संचालकांच्या निवडणुकीसाठी 17 हजार 746 इतके मतदार आहेत. यामुळे इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार अडते-व्यापारी मतदारसंघात आहेत.

त्यांची संख्या 13 हजार 174 इतके आहे. अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन संचालक बाजार समितीवर निवडून दिले जातात. मात्र, एकूण मतदारांच्या 74 टक्के मतदार हे याच मतदारसंघात असल्याने सर्वाधिक चुरशीची निवडणूक या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे.

आता गाई-म्हशीचे शेणही देईल बंपर नफा, या पद्धतीने करा वापर..

याबाबत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी एक सभा घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एकच पॅनेल करण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोगऱ्याची शेती आहे खूपच फायदेशीर, शेतकऱ्यांना होतोय फायदा

दरम्यान, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाचे अनेक जण इच्छुक असल्याने अजित पवार यांच्याशी मुंबईत चर्चा झाली. सर्वांना विश्वासात घेऊन या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एकच पॅनल करावा, अशी तयारी सध्या सुरू आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांनो काळजी घ्या
शेतकऱ्यांनो द्राक्षाचे पूर्ण पेमेंट मिळण्याबाबत खातरजमा करा, होतेय फसवणूक
तरुणीने अभ्यासासोबतच डुकर पालनातून कमवले लाखो रुपये

English Summary: Pune Bazar Samiti election has been sounded, list voters has published, aspirants running Published on: 16 March 2023, 11:02 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters