राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने अर्थ संकल्पात भरीव तरतूद केली आहे. मात्र तरीदेखील पुणे बाजार समितिने स्वताचे उत्पन्न १४ कोटीने वाढवून बाजार समित्या सक्षम करण्याचा धड़ा राज्यातील इतर बाजार समित्यांना दिला आहे. या बाजार समितीवर प्रशासक असून सुद्धा उत्पन्नात वाढ झाल्याने बाजार समित्या टिकवण्यासाठी प्रशासक की संचालक मंडळ अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरु आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला २०२१-२२ या आर्थिक वर्षात बाजार शुल्काद्वारे सुमारे ५१.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४ कोटी रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.
या बाबतची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०२१-२२ या वर्षात फळ,कांदा बटाटा विभागातून १४ कोटी १० लाख रुपये, तरकारी विभागात ९ कोटी ६६ लाख रुपये तर इतर विभागातुन २३ कोटी ७६ लाख रुपयांचे उत्पन्न बाजार शुल्काच्या (सेस) माध्यमातून मिळाले आहे. या तीन विभागात पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा २१ टक्क्यांनी तर गुळ भुसाराच्या उत्पन्नात २० टक्कयांनी वाढ झाली आहे.
गुळ भुसार विभागाने बाजार शुल्कापोटी १९ कोटी ६९ लाख तसेच देखभाल शुल्कातून २ कोटी ५८ लाख असे २१ कोटी ५९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. भाजीपाला बाजारातील २३.७६ कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नात यंदा पार्किंग शुल्कातून सुमारे सव्वाकोटी रुपये मिळाले आहे. मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील विविध विभागासह उपबाजारांतून येत असलेल्या उत्पन्नात भर पडली आहे.
पिंपरी उपबाजार, खडकी उपबाजार, भरारी पथक, पान बाजार, फुल बाजार, केळी बाजार, मांजरी उपबाजार, मांजरीचे फूल बाजार या ठिकाणी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. समितीकडे १५५ कोटी रुपयांच्या ठेवी असल्यामुळे समितीने कोणत्याही संस्थेकडून एकही रूपयाचेही कर्ज घेतलेले नाही. सेस वेळेवर भरण्यासाठी बाजार समितीद्वारे अडत्यांना आव्हान केले.
शिवाय समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत सेसमध्ये वाढ झाली असल्याचे प्रशासक गरड यांनी सांगितले. यामुळे सध्या बाजार समितीमध्ये याची चर्चा रंगली आहे. कोरोनामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार आले आहेत. असे असताना इतर बाजार समितीच्या तुलनेत या बाजार समितीची परिस्थिती चांगली आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता वीज तोडली तरी घाबरू नका, पठ्ठ्याने ट्रॅक्टरच्या सहायाने केली वीज निर्मिती
साहेब खिशात पैसा नाही म्हणून तुम्हाला भीक मागतोय, आम्हाला फक्त लाईट द्या, शेतकरी ढसाढसा रडला
Fertilizer: खरिपाच्या तोंडावर खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, शेतकऱ्यांनो 'हे' दर बघूनच खरेदी करा..
Share your comments