संग्रामपूर : शेतकऱ्यांचा अडकलेला पीक विम्याचा पैसा मिळवून देण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भाचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नामुळे पीक विम्याचे ६४ रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याने पातुर्डा येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे खरे कैवारी म्हणून प्रशांत डिक्कर यांचं भव्यदिव्य स्वागत केले.
मागील वर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. परंतु शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी कोणताही राजकीय पुढारी पुढे आला नाही. अशातच शेतकऱ्यांची जाण असणारे प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा मिळावा यासाठी जनआंदोलन उभारले. हे जन आंदोलन मुंबई विधिमंडळात पोचले आणि तिथून पुण्याला. सातत्याने दहा महिने संघर्ष करून स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी संग्रामपूर, शेगाव, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ६४ कोटी ७ लाख रुपये पिकविमा मंजूर करून आणला. प्रशांत डिक्कर यांचा पातुर्डा खुर्द येथे आगमन झाले असता, शेतकरी बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांच भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना डिक्कर म्हणाले की, शेतकऱ्यांना पीकविमा तर मिळाला परंतु, सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा यासाठी संपूर्ण विदर्भामध्ये खूप मोठं आंदोलन उभारण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी उपस्थिती दर्शविली. गेल्या पंचवीस वर्षापासून एकही राजकीय पुढारी शेतकऱ्यांसाठी लढला नाही, कोणत्याही राजकीय पुढार्यांने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही.
परंतु प्रशांत डिक्कर यांच्या रूपाने शेतकऱ्यांचा खरा नेता हा आज समोर आला आहे, आणि त्यांना शेतकऱ्यांनी सर्वतोपरी मदत करा ,असे मत भाऊ भोजने यांनी यावेळी व्यक्त केले. या सत्कार समारंभामध्ये स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अनंता मानकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ताकतीने प्रशांत डिक्कर यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांनी उभे रहावे असेल मत बोलतांना व्यक्त केले.
यावेळी शंकर झाडोकार, समाधान झाडोकार, विलास मानकर, शिवानंद झाडोकार, संतोष गाडकर, बंडू ढोकने, विनोद येणकर, नरेंद्र झाडोकार, जीवन मुयांडे, अमोल खंडेराव सर,उज्वल चोपडे ,विठ्ठल वखारे , विजय बोदडे, बळीराम झाडोकार, गणेश झाडोकार, आशिष म्हसाळ, विजय ठाकरे , गोपाल भिसे, राजू उमाळे, आकाश कोठे, पप्पू करांगळे, सागर भाकरे सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधि गोपाल उगले
Share your comments