1. बातम्या

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना कारखान्यांच्या गेटवरच मूलभूत सुविधा द्याव्यात;ऊस आयुक्तांचे निर्देश

साखर कारखान्यांनी कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांना थंडी तसेच शीतलहर आणि कोविड19 च्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर,हँडवॉश, पाणी आणि शेकोटी अशा मूलभूत सुविधा पुरवाव्यात असे निर्देश राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय आर. भूसरेड्डी यांनी कारखान्यांना दिले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cane factory

cane factory

साखर कारखान्यांनी कारखान्याच्या गेटवर शेतकऱ्यांना थंडी तसेच शीतलहर आणि कोविड19 च्या  संक्रमणापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर,हँडवॉश, पाणी आणि शेकोटी अशा मूलभूत सुविधा पुरवाव्यात असे निर्देश राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय आर. भूसरेड्डी यांनी कारखान्यांना  दिले आहेत.

या दिलेल्या आदेशात उस आयुक्तांनी म्हटले आहे की,साखर कारखान्यांनी त्यांच्या गेटवर तसेच यार्डमध्येशेकोटी,गरम पाण्याची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांनाथंडीपासून स्वतःचा बचाव करता येईल त्यांना थंडीत कुडकुडावे लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांना हात धुण्यासाठी पाणी,साबण,  योग्य ठिकाणी सॅनिटायझर ची व्यवस्था केल्यास कोविड 19 चे संक्रमण रोखता येईल.

सध्या वातावरणामध्ये दाट धुके असल्यामुळे वाहनांची दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कारखान्याच्या गेटवर तसेच ऊस खरेदी केंद्राच्या ठिकाणी ऊस भरताना आलेल्या सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर पट्टी लावावी. हंगामामध्ये दोन ते तीन वेळा अशाप्रकारे वाहनांना रिफ्लेक्टर पट्टी लावण्याची मोहीम राबवून रस्‍ता सुरक्षितता याबाबत याची काळजी घ्यावी. सर्व साखर कारखाना यांनी आपापल्या क्षेत्रात याबाबत कार्यवाही करावी.

विभागीय अधिकारी यांना उस आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या कारखाना कार्यस्थळ,केन यार्डमधील भेटीप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून फीडबॅक घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शेतकऱ्यांना ज्या व्यावहारिक समस्या येतात त्यांची सोडवणूक करणे शक्य होईल असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

English Summary: provide fundamental things to farmer give order suger commisioner to suger factory Published on: 18 January 2022, 01:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters