1. बातम्या

मुबलक प्रमाणात हरभरा बियाणे उपलब्ध करुण द्या - स्वाभिमानीचे विनायक सरनाईक

मुबलक प्रमाणात हरभरा बियाणे उपलब्ध करुण देण्यासह सोयाबीन भाव फरकाच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी घेतली महाबिज व्यवस्थापकीय संचालकाची भेट

KJ Maharashtra
KJ Maharashtra
स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी घेतली महाबिज व्यवस्थापकीय संचालकाची भेट

स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी घेतली महाबिज व्यवस्थापकीय संचालकाची भेट

चिखली-गत वर्षी बाजारात भाव जास्तीचे असतांना महाबिजकडुन सोयाबीन बिजोत्पादक शेतकर्याना भावफरक मिळेल अशी अपेक्षा होती.परंतु वर्ष उलटुनही भावफरक मिळाला नसल्याने महाबिज सोयाबीन बिजोत्पादक शेतकरी यांना भावफरक रक्कम देण्यात यावी,यावर्षी हरभरा बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करुण देण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी दि08/10/2021रोजी अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उत्पादन व्यवस्थापक श्री पुंडकर यांची भेट घेत त्यांच्याकडे केल्या आहेत.

 

तालुक्यातील शेतकरी नियमीत सोयाबीन व इतर बियाणे महाबिजकडुन खरेदी करीत असतात शेतकरी महाबिज बिजोप्तादन कार्यक्रमास पसंती देतात गतवर्षी म्हणजेच सन२०२०-२१मधे बाजारामध्ये ८ हजार रू ते १०हजार रु क्वी सोयाबीनचे दर असतांना महाबिज सोयाबीन बिजोत्पादक शेतकरी यांना महाबिज कडुन ५२००रु भाव देण्यात आला होता.विशेष म्हणजे त्यावेळी नापास(फेल)

सोयाबीन सिडस व लो ग्रेड सोयाबीन मार्केटला दहा हजार रु दराने विकले जात असतांना तेव्हा सुद्धा शेतकर्यानी राखत झळ खात चांगले सोयाबीन बियाणे महाबिजला देण्यास पसंती दर्शवीली होती.शेतकरी महाबिज कडे खरीप व रब्बी हंगामाची बुकींग करतात परंतु मागणी पेक्षा कमी बियाणे शेतकर्याना मिळत असतांना शेतकरी नियमीत महाबिज व शासनाचा विचार करतो परंतु सतत झळ सोसुन महामंडळ टिकुन ठेवणार्याना भावफरक मिळणार का?

शेतकर्याचा विचार शासन करणार का?असा सवाल शेतकरी उपस्थीत करीत आहे.दरम्याण दरवर्षी पावसाने नुकसान होत असल्याने हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गीक संकटानमुळे हिरावला गेल्याने शेतकरी शासनाप्रती रोष व्यक्त करतांना दिसत असल्याने शेतकर्याना दिलासा मिळण्याच्या दृष्टिने

गत वर्षी म्हणजेच सन २०२०-२०२१ महाबिजच्या सोयाबीन बिजोत्पादक शेतकर्याना प्रति क्वी २५००रु ची भाव फरकाची रक्कम देण्यात यावी,यावर्षी तलाव,विहरी मध्ये पाणीच पाणी असल्याने दरवर्षी पेक्षा मुबलक प्रमाणात महाबिजचे हरभरा बियाणे उपलब्ध करुण देण्यात यावे,

त्याच प्रमाणे शेतकर्याना सतत उद्भवत असलेल्या मागण्यांच्या अनुषंघाने स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री जयवंशी व उत्पादन व्यवस्थापक श्री पुंडकर यांची भेट घेत सविस्तर चर्चा करीत

 केली असुन शेतकर्याच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकर्यासह तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: Provide abundant gram seeds Swabhimani's Vinayak Saranaik Published on: 10 October 2021, 06:53 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters