मागील वर्षात डिसेंबर महिन्यात कृषी जागरण मिडीया हाऊसने शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा अर्थातच मिलिनेयर फार्मर ऑफ अवॉर्ड सोहळा पार आयोजित केला होता. त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांसाठी आणखी एक मेळा किंवा कृषी महोत्सव आयोजित केला जाणार आहे.
शेतकर्यांसाठी वेगवेगळ्या वेळी विविध मेळावे आयोजित केले जातात. ज्यात हजारो शेतकरी योगदान देतात. बरेच जण नवीन शेती कौशल्ये शिकतात आणि शिकवतात. तसंच शेतकरी मेळावे किंवा उत्सवांमध्ये योगदान देतात आणि त्यांच्या शेती पद्धतींबद्दल माहिती शेअर करतात. ज्यामुळे त्यांना मदत होते. त्यामुळे शेतकरी यशस्वी झाले.
तसेच काही मेळावे दिल्लीमध्ये कृषी जागरण मिडीया हाऊसने आयोजित केले आहेत. नुकतेच या संस्थेने अनेक कृषी मेळावे आयोजित केले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक यश संपादन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आणि शेतीसाठी आणखी एक मेळावा किंवा कृषी महोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते.
तर या कृषी महोत्सवाचे नाव आहे "समृद्ध किसान महोत्सव'. गुरुग्रामच्या सिकोहपूर येथील कृषी विज्ञान केंद्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २५० हून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. मिलेनियर फार्मर्स ऑफ इंडिया अवॉर्ड आयोजित कृषी जागरण तसंच या कार्यक्रमाचे प्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर्स आहेत. कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समृद्ध किसान महोत्सवात उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे, कंपन्या स्टॉल लावू शकतात, महिंद्रा, ह्युंदाई सारख्या कंपन्या सहभागी होत आहेत. कंपन्या त्यांच्या अपेक्षेनुसार प्रायोजक म्हणून भागीदारी देखील करू शकतात. तुम्हालाही आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता. तसंच कृषी महोत्सव किंवा स्टॉलबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
Stall Booking form for Companies & other details
https://forms.gle/6QkLBhGKKzsJxg3QA
Share your comments