1. बातम्या

राज्यातील 10 नव्या वाणाना जीआय मानांकन देण्यासाठी प्रस्ताव सादर- कृषी मंत्री दादाजी भुसे

देश व राज्यपातळीवर जी आय मानांकनांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पणन आणि अपेडा ला सोबत घेत कृषी विभाग काम करेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
dadaji bhuse

dadaji bhuse

देश व  राज्यपातळीवर जी आय मानांकनांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पणन आणि अपेडा ला  सोबत घेत कृषी विभाग काम करेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले.

त्यासोबतच राज्यातील दहा  नव्या वानांना मानांकन देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलंय असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथील साखर संकुल  येथे कृषी मंत्री भुसे यांनीजी आय मानांकन याबाबत आढावा घेतला.यावेळी राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसचिव गणेश पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते तसेच पणन संचालक सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना दादा भुसे म्हणाले की,राज्यातील एकूण 22 पिकांना 26 मानांकन मिळाले आहेत व त्यासोबत दहा नवीन वाण मानांकनासाठी प्रस्तावित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पना असलेले राज्यात विकेल ते पिकेल याअंतर्गत मागणी असलेल्या वानाचे शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. ज्या वानांना जी आय मानांकन प्राप्त असेल अशा वानांना शासन पाठबळ  असणार आहे. जी आय मानांकन मिळालेल्या वानांच्या आता ब्रॅण्डिंग करण्यात येणार आहे. 

ज्या वानांना जी आय मानांकन मिळाले आहे अशा वानांच्या कृषी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी व नोंदणी तसेच बाजारपेठ अशा चार स्तरावर योजना तयार केल्याने त्याचा फायदा हा ब्रँडिंग ला होणार आहे.तसेचजी आय मानांकन मिळालेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये पणन व अपेडा अंतर्गत तसेच कृषी विभाग कृषी उत्पादकांना मदत करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

English Summary: proposal present to ten veriety of crop for geographical rating of state Published on: 13 February 2022, 09:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters