1. बातम्या

भेंडवळची भविष्यवाणी आली! यावर्षी राहणार पावसाळा सर्वसाधारण, तिसऱ्या व चौथ्या महिन्यात भरपूर पावसाचे भाकीत

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणी ची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. अखेर भेंडवळ गावची की भविष्यवाणी करण्यात आली आहे. या भविष्यवाणीत साधारणपणे देशांमध्ये चालू वर्ष कसे असेल याबद्दल चे भाकित वर्तवण्यात येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
prophecy of bhenval is so crucial in farmer for guess rain,politics situation etc of country

prophecy of bhenval is so crucial in farmer for guess rain,politics situation etc of country

 बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणी ची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. अखेर भेंडवळ गावची की भविष्यवाणी करण्यात आली आहे. या भविष्यवाणीत साधारणपणे देशांमध्ये चालू वर्ष कसे असेल याबद्दल चे भाकित वर्तवण्यात येते.

यामध्ये घट मांडणी केली जाते व त्याआधारे भाकित वर्तवण्यात येते. भेंडवळची भविष्यवाणी नुसार यावर्षी पावसाळा सर्वसाधारण राहणार असून, पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या महिन्यात कमी तर तिसऱ्या व चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस असण्याचा अंदाज वर्तण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वर्षी अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात असेल असे देखील या भविष्यवाणी वर्तवण्यात आले आहे. देशात रोगाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे देखील म्हटले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावांमध्ये दरवर्षी अंदाज वर्तविण्यात येतात. भेंडवळची भविष्यवाणी राज्यभरात प्रसिद्ध आहे. या भविष्यवाणी मध्ये चालू वर्षात देशात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कशी राहील याबाबत देखील अंदाज वर्तवण्यात येतो. त्यानुसार शेवटचे दोन महिने या वर्षी पावसाचे पाऊस अधिक राहील तसेच पिकांचे प्रमाण चांगले राहणार असून पीक नासाडीचे शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पावसा व्यतिरिक्त पुढे या भविष्यवाणी मध्ये म्हटले गेले आहे की, यावर्षी देशाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे तसेच परकीय सत्तांचा त्रास देखील वाढू शकतो.

आपल्या देशाचा संरक्षण विभाग या सर्व गोष्टींना समर्थपणे तोंड देईल. तसेच गेल्या दोन-तीन वर्षापासून पूर्ण देश कोरोना महामारी चा सामना करत आहे. परंतु यावर्षी दिलासादायक भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे ती म्हणजे, या वर्षी देशावर रोगाचे संकट कमी राहणार असल्याचे यामध्ये म्हटले गेले आहे.

 घटमांडणीचा इतिहास

 भेंडवळ गाव पूर्णा नदीच्या काठी वसलेले असून या गावात चंद्रभान महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी घटमांडणी ची  सुरुवात केली. त्यामुळे या घटमांडणी ला  तीनशे वर्षापासून परंपरा आहे. यामध्ये तीन मे रोजी घटमांडणी करून 4 मे रोजी पहाटे भाकित वर्तवले जाणार आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे भाकीत जाहीर करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी गावाशेजारील एका शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. या घटामध्ये गहू, ज्वारी, तुर, उडीद,मूग, हरभरा यासह इतर आठ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते.

घटाच्या मध्यभागी  मातीची ढेकळे आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, सांजोरी, कुरडई इत्यादी खाद्यपदार्थ की ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता या पदार्थांमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून भाकित वर्तवले जाते.(स्त्रोत-tv9मराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:भारतीय खाद्य महामंडळाकडून 'फुले विक्रम' जातीच्या हरभरा खरेदीस टाळाटाळ, ही आहेत त्यामागील कारणे

नक्की वाचा:Organic Farming : पद्मश्री भारत भूषण यांनी सांगितला सेंद्रिय शेतीचा बेस्ट फॉर्मुला; उत्पन्न दुपटीने वाढणार

नक्की वाचा:खांदेशात अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमला जातो नवीन सालगडी; मात्र कठीण परीक्षा करावी लागते पास; वाचा याविषयी

English Summary: prophecy of bhenval is so crucial in farmer for guess rain,politics situation etc of country Published on: 04 May 2022, 09:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters