मॉन्सूनने दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गुरुवारी पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत , संपुर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहे. अरबी समुद्रात असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मॉन्सूनचे वाऱ्यांचे प्रवाह प्रभावित होऊन १ जून केरळमध्ये दाखल झाला आहे. देशाच्या मुख्य भूमीवर आगमन होताच, गुरुवारी केरळचा कोरमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटक किनारपट्टीवरील कारवार, हसनपर्यंत आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले.
. हवामान विभागाच्या मते, मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थीत असून दक्षिण पश्चिम मॉन्सून प्रगती करत असून लवकरच पूर्ण देशात आपली हजेरी लावेल. दरम्यान पुढील सात दिवसात मॉन्सून उत्तर भारताच्या सीमेवर धडकेल. बिहारमध्ये १५ ते २० जून दरम्यान मॉन्सून येण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये १५ जूनला येणार असल्याची शक्यता आहे. निसर्गमुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडल्याने पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली. कर्नाटक तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नव्हता. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होऊ लागले असून शनिवारी कर्नाटक, तामिळनाडूच्या अंतर्गत भागासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे.
अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळाच्या निर्मिती आता अजून एका वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. उद्या उपसागराच्या पूर्वमध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याची तीव्रता वाढवण्याचा अंदाज आहे. आज मुंबईत ढग जमा झाले असून हलक्या स्वरुपाच पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा असल्याने पूर्वीकडे वाऱ्यांमुळे १२ जून आणि १३ जूनला दिल्ली - एनसीआरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Share your comments