भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सर्वात जास्त तरुण पिढी ही शेती व्यवसायात कार्यरत आहे. सध्या शेती व्यवसायात अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. यामध्ये व्यवस्थापन, अत्याधुनिक तंत्र प्रणाली,खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेतीमधील उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा समावेश:
सध्या शेतीमध्ये अनेक अत्याधुनिक यंत्रसामग्री चा वापर होत आहे. शिवाय नवनवीन यंत्राचा वापर होऊ लागला आहे. यंत्राचा वापर वाढल्याने शेतकरी वर्गास आराम मिळू लागला आहे कारण यंत्राच्या साह्याने शेतीची कामे क्षणार्धात होतात आणि मजुरांची कमतरता सुद्धा भासत नाही. या यंत्रामुळे शेतकरी सुखावला आहे.सध्या पंजाब कृषी विद्यापीठाने होशियारपूर स्टील बरोबर एक नवीन करार केला आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र तयार केले आहे आणि करार हा होशियारपूर स्टील बरोबर केला आहे.
या अत्याधुनिक ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्रामुळे शेतकरी वर्गाचा मोठा फायदा होणार आहे शिवाय या पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या भातपिक अवशेषांच्या व्यवस्थापनाचा प्रश्नकायमचा मार्गी लागू शकेल. या यंत्राची खास बात म्हणजे या यंत्रात सुपर सिडर आणि हॅप्पी सिडर या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांना अवशेषांचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे आणि सुखकर होईल, असा विश्वास पंजाब विद्यापीठाच्या कृषी सयंत्रे आणि ऊर्जा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. महेश कुमार नारंग यांनी दिला आहे.
या यंत्राचा फायदा म्हणजे ट्रॅक्टरच्या मदतीने वापरण्यात येणाऱ्या या पेरणी यंत्राद्वारे बियाणे जमिनीत अचूक ठिकाणी सोडणे सहजशक्य होणार आहे. हे यंत्र चालवण्यासाठी ४५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टर ची आवश्यक भासणार आहे. प्रति तासाला ०.४ हेक्टर जमीन पेरण्याची आणि एका लिटर इंधनात ५ एकर जमीन पेरण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे असे म्हणणे पंजाब कृषी विद्यापीठाचे आहे.
पंजाब कृषी विद्यापीठाने आजपर्यंत आपल्या विविध संशोधनासाठी 289 संस्था आणि वेगवेगळ्या कंपन्यांसोबत असे सहकार्य करार केले आहेत. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या कामाला गती।प्राप्त होऊन कमी वेळात अधिक कामे होतील शिवाय शेतकरी वर्गासाठी अनमोल ठेवा असणारे हे यंत्र ठरणार आहे.
Share your comments