साखर कारखाने उभे राहू लागले तसे अल्कोहोल निर्मिती ज्ञान अधिक विकसित होऊ लागले. साखर तयार होताना मळी हा उपपदार्थ तयार होतो. मळीमध्ये शर्करेचे प्रमाण भरपूर असते. मळीमध्ये २२ टक्के पाणी आणि ५० ते ५५ टक्के पिष्टमय पदार्थ असतात, याशिवाय जीवनसत्त्व बी-६, मँगेनीज, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम यांसारखी खनिजे असतात.
अल्कोहोल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापराचे असेल तर ते जलविरहित करण्यासाठी पुन्हा उन करावे लागते. हे तयार होताना जे द्रव्य शिल्लक राहते, त्याला स्पेंटवॉश म्हणतात. हे द्रव्य प्रदूषण करणारे असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प चालवावा लागतो. त्यापासून खत निर्मिती शक्य आहे.
जसे जसे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वाढू लागले तसे तसे सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली. ऊर्जेची गरज वाढत आहे. देशाच्या इंधन गरजेच्या ८४ टक्के म्हणजेच सुमारे २२४ कोटी टन इंधनाचा पुरवठा हा आयातीवर अवलंबून आहे. या तेलाच्या आयातीसाठी २०१८-१९ मध्ये आपण १११ अब्ज डॉलर खर्च केले आहेत.
कांदा अनुदान मिळण्यास पीक नोंदणीचा अडसर, शेतकरी नाराज
२०४० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा ग्राहक असण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आयात करणे देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजेसाठी पर्याय शोधणे अत्यावश्यक आहे. यासाठी अपारंपरिक कर्जेचे स्रोत असलेले सौर ऊर्जा, हायड्रोजन वायू, पवन चक्की, इथेनॉल जलविरहित इथेनॉल इत्यादी पर्यायी व्यवस्थेचा वापर करण्याचे धोरण केंद्र सरकार राबवीत आहे.
तसेच तांदूळ, ज्वारी मका इत्यादीपासूनसुध्दा मिळू शकते पेट्रोलवरील वाहने चालवताना कमी जीवाश्म इंधन जाळण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करता येते. रस्ते वाहतूक क्षेत्रातील साधारणपणे ९८ टक्के इंधनाची गरज ही जीवाश्म इंधनाद्वारे पूर्ण होते. जगभर तेलाच्या किमतीत सतत वाढ होत आहे.
काय सांगता! आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, जाणून घ्या..
कारखान्यांनी त्यांच्या काही युनिटमध्ये साखर उत्पादन बंद करून उसाच्या रसावरील प्रक्रियेतून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढवण्याचे ठरविले आहे. अनेक कारखान्यांनी बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा मार्ग अवलंबला आहे.
देशांमध्ये साखरेचे अतिरिक्त साठे आहेत. सध्या साखर निर्यातीचे प्रयत्न यशस्वी होताना दिसतात. साखरेचे साठे विकून पैसे मिळण्यास कारखान्यांना मोठा कालावधी लागतो. याउलट इथेनॉलचे पेमेंट तेल कंपन्यांकडून लवकर मिळते. आता ऑइल कंपन्यांनी इथेनॉलला दिलेले दर हे प्रोत्साहन देणारे आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करणे गरजेचे
विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने नोटांची उधळण करत केला राडा..
कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत, असा करा अर्ज..
Share your comments